ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र मधील बीड जिल्ह्यातील विविध 13 मुद्द्यांवर देण्यात आले निवेदन

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्र मधील बीड जिल्ह्यातील विविध 13 मुद्द्यांवर निवेदन देण्यात आले. नितीन सोनवणे 
बीड प्रतिनिधी:- डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण बीड, महात्मा फुले अंतर्गत NSFDC - 641 दाखल केलेल्या फाईलचा निधी लाभार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा. व 162 कोटी अनुसूचित जातीचा वळवळेला निधी वापस देण्यात यावा.

विशाल गड दंगलीतील दंगलखोरांना अटक झाली पाहिजे. नुकसान झालेल्या ग्रामसथांना त्यांची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. आरोपींना UAPA ॲक्ट अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जिल्हा व तालुक्यातील भूमीहीनांना दलितांना तात्काळ जमीन द्यावी. 

आजच्या तारखेपर्यंत ताब्यात असलेल्या गायरान जमिनीचे तात्काळ सातबारा देण्यात यावेत. 

फिलोशिप स्वाधार घरकुल योजनेचा सामाजिक न्यायचा निधी इतरत्र वळवू नये फिलोशिप सरसकट द्यावी.

बीड येथील श्रेयस सोलार श्रेयस कंट्रक्शन जीएस एजन्सी श्री पंडित मोहन जगताप आणि तात्यासाहेब मोहन जगताप यांनी शासनाच्या विविध योजनेमध्ये बोगस कामे करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याने सण 2018 जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत केलेल्या सर्व कामाची हेड निहाय चौकशीचे आदेश द्यावेत व दोशींवर योग्य ती कारवाई करावी.

पाणंद रस्त्याच्या नावाखाली बीड जिल्ह्यामध्ये बोगस बिले उचलण्याचे चौकशी करण्याचे आदेश द्यावेत व दोषींवर योग्य कारवाई करावी उचललेला शासनाचा निधी सातबारावर बोजा टाकून वसूल करावा.

तुझ्यावर रेप झाला का असे म्हणून दलित पत्रकार मोहिनी जाधव हिचा विनयभंग जातीवाद करणारा आरोपी वामन म्हात्रे शिवसेना शिंदे गटाचा शहराध्यक्ष असून त्याच्यावर विनयभंग ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल झाला असून त्यावर कठोर शासन करावे.

21/08/2024 रोजी ज्या एस सी एसटी आरक्षण वर्गीकरण निर्णयाच्या संदर्भात महाराष्ट्रभर आंदोलन कर्त्यांवरील दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या.

शासकीय वसतिगृहात खाजगी कंत्राटदारा मार्फत सुरक्षा कर्मचारी देण्याचा जीआर रद्द करा.

पोलिसांना अवमान करणाऱ्या त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोचणाऱ्या आमदार निलेश राणीला अटक करा.

स्वामी विवेकानंद आश्रम शाळा लातूर याची मान्यता रद्द करा व मयत अरविंद खोपे वय १३ वर्षं या विद्यार्थ्यास मारणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या.

बीड जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस वस्तीग्रह व जिल्हा परिषद शाळेमध्ये मुली वाचवण्यासाठी शासनामार्फत सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने देण्यात आले . या वेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, बीड तालुका अध्यक्ष महिला आघाडी कावेरी जाधव, बीड तालुका उपाध्यक्ष निसार शेख, शहराध्यक्ष सोशल मीडिया उमेश पारिख, शहराध्यक्ष कोमल तुरुकमारे, दीपक वाघमारे व संघटनेतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !