मुळुकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांकडुन बाथरूम स्वच्छता धक्कादायक प्रकाराची शिक्षण विभागाकडून दखल; विस्तार अधिका-यांची शाळेला भेट :- डॉ.गणेश ढवळे

 

लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मुळुकवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांकडुन बाथरूम स्वच्छता करायला लावत असल्याचा व्हिडिओ काल दि.२८ मंगळवार रोजी एका ग्रामस्थाने काढून सोशल मिडीयावर अपलोड केला होता. याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची दखल घेत आज दि.२९ बुधवार रोजी सकाळी शिक्षणाधिकारी यांच्या सुचनेवरून विस्तार अधिकारी मधुकर तोडकर, केंद्र प्रमुख आबासाहेब हांगे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.तसेच शाळेतील पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल वरीष्ठांना सादर करणार असल्याचे सांगत भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडु नये याची दक्षता घेण्याची सुचना केली.

बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथे १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असुन ५२ विद्यार्थी पटसंख्या असुन दोन शिक्षक कार्यरत आहेत.परंतु एक पद रिक्त असल्याने तात्पुरती सोय म्हणून नागोबा शिक्षक केकाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काल दि.२८ रोजी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे बाथरूम स्वच्छ करायला लावले. गावातील काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता याबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
 
त्या दिवशी रजेवर :- मुख्याध्यापिका श्रीमती घरत 

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घरत यांनी काल दि.२८ रोजी मी एक दिवसाच्या रजेवर होते. मी या शाळेत ७ वर्षांपासून कार्यरत असुन या शाळेत पहिली ते ४ थी पर्यंत ५२ विद्यार्थी आहेत. शाळेत शिपाईपद नसल्याने अनेकदा स्वच्छतेची कामे विद्यार्थ्यांना सांगितली जातात. स्वच्छता व ईतर कामांसाठी कसलाही निधी नसतो मात्र बाथरूम स्वच्छतेचे काम करून घेण्यात येत नाही. कालचा प्रकार मला समजल्यानंतर याची माहिती घेऊन सहशिक्षक केकान यांना समज दिली आहे.

चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवला :- मधुकर तोडकर विस्तार अधिकारी बीड 

शिक्षणाधिकारी यांनी मुळुकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून बाथरूम स्वच्छता करून घेतल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पाठवले असुन शाळेत केंद्र प्रमुख आबासाहेब हांगे यांच्या समवेत पालक, ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या सोबत चर्चा करून संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवला असल्याचे विस्तार अधिकारी मधुकर तोडकर यांनी सांगितले.

शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिपाई भरती करावी:- डॉ.गणेश ढवळे 

बीड तालुक्यातील मुळुकवाडी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडुन बाथरूम स्वच्छता करण्याचा धक्कादायक प्रकार दुर्दैवी असुन बीड जिल्ह्यातील २४०० शाळांमध्ये शिपाई नसल्याने शाळेतील साफसफाई व ईतर कामे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना करावी लागत असुन शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिपाई पदांची भरती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !