अमोलजी सुतार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे (गट ) शिवसेना गेवराई तालुका उपप्रमुखपदी निवड


गेवराई (प्रतिनिधी
)गेवराई शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे तरुण कार्यकर्ते मातंग समाजातील हा कोहिनूर हिरा माजी मंत्री बदामराव पंडित यांचे खंदे समर्थक तरुण तडफदार अमोल मधुकर राव सुतार यांची गेवराई तालुका उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीनंतर त्यांचे गेवराई शहरातील तरुणांनी जंगी स्वागत केले आहे उपप्रमुख पदी निवड होताच त्यांनी बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यात शिवसेनेचे मोठे जाळे निर्माण करून आगामी विधानसभेत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे अमोलजी सुतार यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गेवराई तालुका उपप्रमुख म्हणून अमोल सुतार यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे अमोलजी सुतार गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक वेळा परिश्रम घेतले गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या कामाची दखल घेऊन बदामराव पंडित यांनी त्यांची गेवराई तालुका उपप्रमुख म्हणून निवड केली यावेळी गेवराई शिवसेना तालुकाप्रमुख अजय भैय्या दाभाडे कैलास राठोड मिलिंद वाघमारे फैसल जाऊस पत्रकार दिनकर शिंदे अविनाश भिसे व गेवराई तालुक्यातील शिवसैनिक बहाद्दर प्रमुख पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी अमोल जी सुतार यांचे निकटवृतीय मित्र व समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्याकडून त्यांचे अभिनंदन होताना दिसत आहे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !