लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह संपन्न

लिंबागणेश:- ( दि.२८)बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सव निमित्त मोठ्या उत्साहात संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह (दशम स्कंध) आयोजन करण्यात आले होते. सप्ताह कालावधीत सकाळी पारायण,उटी उपहार, सायंकाळी आरती, प्रवचन आणि रात्री भागवत कथा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती.सप्ताहाची सांगता काल दि.२७ आगस्ट मंगळवार रोजी कथा प्रवाचक भागवताचार्य किर्तनकार गिरीशराज शास्त्री महानुभव यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.यावेळी पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेस्कर, महंत विश्वनाथ बाबा तसेच पंचक्रोशीतील महानुभव भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमात भजनी मंडळी पांडुरंग वाणी, बाजीराव दशमे,शिवहारी कोटुळे, विनायक मोरे, बाबुराव वाणी यांनी रंगत आणली.सांगता समारंभात आ.संदिप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर, रामकृष्ण बांगर यांनी भेट दिली. काल्याच्या किर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सविस्तर माहितीस्तव 
-----
लिंबागणेश येथील श्रीकृष्ण मंदिरात सार्वजनिक श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त दि.२०.०८.ते.२७.०८ दरम्यान संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह ( दशम स्कंध)यांचे आयोजन करण्यात आले होते.
भागवत कथेमध्ये प्रसंगानुरूप नयनरम्य देखावे सादर करण्यात आले होते.सोमवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करुन संपूर्ण गावातुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमासाठी मंदिराचे पुजारी विजय पाटोदेकर, राजेभाऊ आप्पा गिरे, कल्याण बापु वाणी, सरपंच बालासाहेब जाधव, गोवर्धन गिरे, रामकिसन गिरे, अर्जुन गिरे,सुदाम रणखांब, भालचंद्र गिरे,सुदाम मुळे, बाळकृष्ण थोरात, पांडुरंग वाणी, विनायक वाणी, बाळकृष्ण मुळे, विक्रांत वाणी, अभिजित गायकवाड, संतोष भोसले, गिरे, विठ्ठल कदम,शहाजी वाणी, बसवंता खाडीलकर,मांगलकर आदिंनी परीश्रम घेतले.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !