हिवरसिंगा मधील रेल्वेवळण रस्त्याच्या पूलाखालील पाण्याचा निचरा करावा-शिवराम राऊत



(शिरूर प्रतिनिधी) हिवरसिंगा सह मलकाचीवाडी गावातील नागरिक,शेतकरी,विद्यार्थी यांना जाण्यासाठीच्या एकमेव मार्गातील रेल्वेवळणरस्त्याच्या पुलाखालचे साचलेले पाणी निचरा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची शिवराम राऊत,रामेश्वर पांडुळे यांनी भेट घेऊन व्यथा सांगीतल्या.


नगर ते परळी रेल्वेमार्गातील मौ.हिवरसिंगा ता.शिरूर का.जि.बीड येथून मलकाचीवाडी मार्ग जाणा-या जवळागीरी राज्य मार्गातील पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे अनेक वर्षापासुन प्रत्येक पावसाळ्यातील या पुलाखाली किमान४/५ फुट पाणी साचून हिवरसिंगा सानप वस्ती,उतारा वस्ती, दुधाळ वस्ती,चव्हाण वस्ती,सालपे वस्ती, हनुमान नगर,रोकडेश्वर नगर ,मौ.मलकाची वाडी यांना जाण्या-येण्यासाठी अंत्यंत महत्वाचा व एकमेव रस्ता आहे.जोपर्यंत रेल्वे रूळ नव्हते तो पर्यंत वरील रस्त्याने रहदारी होती परंतू सद्यस्थितीत रेल्वे रूळ आसल्याने सदरिल पुलाखालुनच मार्ग आसल्याने या ठिकाणचे नागरिक शेतकरी,विद्यार्थी, रुग्ण यांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत जावे लागते.करिता या विषयी शिरुर तहसिलदार,रेल्वे उपविभाग नगर यांना अनेकवेळा विनंती करूनही साचलेल्या पाण्यावर ठोस उपाययोजना करून गावक-यांचा त्रास अद्यापही कमी केला जात नसल्याने शिवराम राऊत व रामेश्वर पांडुळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी बीड स्वामी सरांची भेट घेऊन हिवरसिंगा मधील रेल्वेवळण रस्त्याच्या पूलाखालील पाण्याचा निचरा करावा अशी विनंती केली आहे.तरी या पावसाळ्यात हिवरसिंगातील या पूलाखालच्या पाणी काढुन देण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्यास रेल्वे रूळावरून गावकरी मार्ग निर्मान करतील असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !