शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे शालेय विद्यार्थीनींची " निषेध रॅली"



लिंबागणेश:- ( दि.२७) देशात आणि राज्यात महिलांवरील, विद्यार्थीनी व युवतींवर अत्याचाराच्या घटनात वाढ झाली असुन सद्यस्थितीत सर्वच स्तरांतील महिला सुरक्षित नसल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या गंभीर प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बदलापुर व अन्यत्र अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.२७ मंगळवार रोजी "निषेध रॅली" काढण्यात आली.अत्याचाराच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, पिडीतांना न्याय मिळाला पाहिजे महिलांवरील अत्याचार बंद करा, अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.महिलांना संरक्षण द्या " लेक वाचवा देश वाचवा" " बदलापूर चिमुकल्यांना न्याय द्या "या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीनींनी हातात धरलेल्या मागण्यांच्या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मारोती मंदिर, ढवळे चौक,सरकारी वाडा, श्रीकृष्ण मंदिर आदी ‌गावातील प्रमुख चौकातुन "निषेध रॅली" काढण्यात आली. बदलापूर, कोलकत्ता सह अन्य महिला अत्याचार प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवुन फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.यावेळी निषेध रॅलीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आबासाहेब हांगे, सहशिक्षक अमर पुरी,भरत चौरे ,संदिपान आगाम, श्रीमती अयाचित सुवर्णा, कुलकर्णी माधुरी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी , पोलिस बंदोबस्तासाठी लिंबागणेश पोलिस चौकीचे पो.हे. नवनाथ मुंडे, राऊत एस ‌डी., डोंगरे बाबासाहेब तसेच सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रां.स. श्रीहरी निर्मळ, दामु थोरात,अक्षय वाणी, रमेश गायकवाड, अर्जुन घोलप, पत्रकार हरीओम क्षीरसागर, डॉ.गणेश ढवळे व ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !