आदर्श मैत्री फाऊंडेशन व अंबाजोगाई दर्शनकडून गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धांचे आयोजन

आदर्श मैत्री फाऊंडेशन व अंबाजोगाई दर्शनकडून गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धांचे आयोजन

जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती व संपादक सतीश मोरे यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील आपल्या मातीचे भूषण ठरलेले अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल हे केबल टीव्ही बरोबरच सोशल मिडियात लाखो दर्शकांचे नंबर वन पसंतीचे चॅनल झाले आहे. अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलमधून चालू घडामोडींचा ताजा आलेख सातत्याने प्रसारण केले जाते. 24 व्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाऊंडेशन आणि अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात विशेषांक प्रकाशन सोहळा, गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई च्या वतीने आकर्षित बक्षीस व रोग पारितोषिक देण्यात येणार असून स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नांवनोंदणी सुरू असल्याची माहिती आदर्श मैत्री फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती व अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी दिली आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल वर्धापन सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धा चे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिले जाते यावर्षी अंबाजोगाई दर्शन चे 24 वा वर्धापन दिन असल्यामुळे दर्जेदार विशेषांक काढण्याचा मानस हाती घेतला आहे. आपल्या परिसरातील मान्यवर लेखकांचे लेख, राजकीय घडामोडींचा वेध घेणारे विशेष वार्तापत्र यात अनेक मान्यवरांच्या मुलाखतींचा समावेश असणार आहे. तर सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे. तसेच लवकरच गणरायाचे आगमन झाल्यानंतर गौरी महालक्ष्मींचे ही आगमन होणार आहे. त्या निमित्ताने आदर्श मैत्री फांऊडेशन महाराष्ट्र राज्य व अंबाजोगाई दर्शन न्युज चॅनलच्या वतीने गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपारिक उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई यांच्याकडून पहिले बक्षीस पाच हजार रूपये, दुसरे बक्षीस तीन हजार रूपये, तिसरे बक्षीस दोन हजार रूपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजार रूपये विजेत्या स्पर्धकांना अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असून स्पर्धकांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल पे, गुगल पे च्या माध्यमातून 250/- रूपये प्रवेश शुल्क भरून आपली नांवनोंदणी अंबाजोगाई दर्शनकडे करावयाची आहे. नांव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांचा स्वतंत्र व्हाट्सअप ग्रुप निर्माण केला जाणार आहे. स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गौरी महालक्ष्मी आरास देखाव्याचे दोन मिनिटांचे व्हिडिओ चित्रीकरण करावयाचे आहे. तर दुसरा पारंपारिक उखाणा घेत असलेल्या महिलेचा व्हिडिओ अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या 9422244170 अथवा 9175508800 या क्रमांकावर पाठवायचा आहे. स्पर्धेचे सर्व व्हिडिओ अंबाजोगाई दर्शन वरून सोशल मिडियावर व्हायरल केले जाणार आहेत. ज्याचे परीक्षण हे दर्शकच करणार आहेत. ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओला दर्शक लाईक कमेंट व पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक जास्त असेल अशा स्पर्धकांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. गौरी महालक्ष्मी आरास देखावा व उखाणे स्पर्धांच्या नांवनोंदणीस प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती आदर्श मैत्री फांऊडेशनचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती व अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचे संपादक सतीश मोरे यांनी दिली आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !