शेवगांव डेपोच्या एस. टी. बस णे प्रवास राम भरोसे

शेवगांव डेपोच्या एस. टी. बस णे प्रवास राम भरोसे 

एस टी बसच्या मागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले शेवगांव आगाराच्या नगरहून मिरी मार्गे शेवगावकडे येणाऱ्या एस.टी. बसची मागील दोन चाके अचानक बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले.
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
या बाबत सविस्तर वृत्त असे की पाठीमागील दोन चाके बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले आगाराच्या अहमदनगरहून मिरीमार्ग शेवगावकडे येणाऱ्या एसटी बसची पाठीमागील दोन चाके अचानक बाहेर आल्याने बसमधील प्रवाशी बालंबाल बाचवाले. रस्त्यावरील नागरिकांच्या
व इतर प्रवाशांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन चालकाच्या ही
बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवली. मात्र या घटनेमुळे एका मोठया अपघातातून प्रवाशांची सुटका झाली असली तरी महामंडळाच्या गाडयांचा व प्रवाशांच्या सुरक्षितते चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेवगाव आगारची अहमदनगरहून मिरीमार्गे शेवगावकडे येणारी बस शनिवार (दि. २४) रोजी दुपारी ४ च्या सुमारास निंबेनांदुर येथे आली. तेथील प्रवाशी उतरवल्यानंतर ही बस भरधाव ढोरजळगावकडे येत असताना चालकाच्या बाजूची मागील दोन्ही चाके अचानक बाहेर आली. ही बाब रस्त्यावरील इतर वाहन चालक व नागरिकांच्या लक्षात आरडाओरड करुन ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान साधून बस एका बाजूला उभी केली.
शेवगाव आगाराच्या सर्व बसेसची अत्यंत दुरावस्था झाली असून, वेगवेगळ्या कारणाने बसमध्ये बिघाड होण्याचे प्रकार सातत्याने सुरु असतात. पण महामंडळाला याबाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. भर रस्त्यावर चालवल्या जाणाऱ्या अशा नादुरुस्त व खिळखिळ्या बस प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. त्याचा मनस्ताप व चालक वाहकांबरोबर प्रवाशांना सहन करावा लागतो.
त्यामुळे आतील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, पाऊस सुरु असल्याने दुसऱ्या गाडीची व्यवस्था होईपर्यंत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. रात्री उशिरापर्यंत आगारातील कर्मचारी बसच्या दुरुस्तीचे काम करत होते.



 नुकताच सेवा आगार तर्फे 17 तारखेला प्रवासी राजा हा कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला परंतु शेवगाव टेंपरेचर रखडलेले बस स्टँड रॅम्पचे काम बसेस ची कमतरता रद्द झालेल्या लांब पल्ल्याच्या फेऱ्या शहराच्या सिटी हार्ट एरियात 12 एकर मोक्याचा असलेला भूखंड अधिकाऱ्यांच्या हराकिरी मुळे जागा असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था डेपोची झाली आहे


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !