महेश भारतीय यांचीवंचितच्या राज्य कार्यकारिणीत वर्णी

महेश भारतीय यांचीवंचितच्या राज्य कार्यकारिणीत वर्णी

राज्यातील आंबेडकरवादी विद्यार्यांकडून निर्णयाचे स्वागत - अक्षय गोटेगावकर
मुंबई -अविनाश भोसीकर, रमेश बारस्कर व महेश भारतीय यांची वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या तिघांची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेदरम्यान लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेले अविनाश भोसीकर आणि रमेश बारस्कर यांची उपस्थिती होती, तर महेश भारतीय यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविले आहे. राज्यासह देशभरात विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थी संघटनांची महेश भारतीयांची मोठे जाळे आहे. अनेक विद्यार्थी प्रश्नांवर भारतीय यांनी टोकदार भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावलेले आहेत विद्यार्थ्यांच्या अडचणीवर तोडगा काढलेला आहे. नुकत्याच प्रदेश शिक्षण शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्यामध्ये भारतीय सर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने केलेली निवड आगामी काळात महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्यभरातील आंबेडकरवादी भारतीय सर यांचे स्वागत व पक्षश्रेष्ठी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. असे सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे जिल्हा निरीक्षक अक्षय गोटेगावकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !