गणेशोत्सव पार्श्वभूमीवर लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर लिंबागणेश येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न; आनंदोत्सव शांतता पुर्वक संयमाने साजरा करण्याचे सपोनि.चंद्रकांत गोसावी यांचे आवाहन 
लिंबागणेश:-( दि .३०) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे आज दि.३० शुक्रवार रोजी सकाळी गणेशोत्सवासह येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर मारोती मंदिरात नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी.चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनात शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. चंद्रकांत रोकडे यांना लिंबागणेश येथील गणेशोत्सव दरम्यान कारवयक्रमाची सविस्तर माहिती घेतली. ग्रामस्थांनी केलेल्या सुचनांचे पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक बीड यांच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.ध्वनीप्रदुषण बाबतीत काळजी घ्यावी,डिजे लावण्यास परवानगी नसुन कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील.सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोष्ट दिसुन आल्यास कायदा हातात न घेता पोलिसांकडे संपर्क साधावा, महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी. गावात होर्डिंग्ज लावण्यापूर्वी ग्रामपंचायतची परवानगी घेणे बंधनकारक आहे. लिंबागणेश येथील भालचंद्र गणपतीची महिमा सर्वदूर असुन शांततेची परंपरा कायम राखत संयमाने उत्सव साजरा करावा.कुठलेही गालबोट लागु नये यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी स्वयं सेवक नेमुन नियंत्रण ठेवावे.पोलिस प्रशासन कायम आपणास सहकार्य करील असे आश्वासन दिले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे,सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी उपसरपंच बाळकृष्ण थोरात, बाळकृष्ण मुळे, शंकर वाणी,भालचंद्र देवस्थान पुजारी श्रीकांत जोशी,वरद जोशी,ग्रां.स. श्रीहरी निर्मळ ,दामु थोरात, रमेश गायकवाड, भगवान मोरे,अशोक जाधव ,अक्षय वाणी, संतोष भोसले,पप्पु आवसरे,अशोकराजे वाणी, दादा गायकवाड, सुरेश ढवळे, नाना वाणी, रामकिसन गिरे,आश्रुबा गिरे, सय्यद बशीर, सुखदेव वाणी, चेतन कानिटकर, औदुंबर थोरात, सुरेश निर्मळ, पत्रकार हरीओम क्षीरसागर , डॉ.गणेश ढवळे,पो.हे.ढाकणे, राऊत,डोंगरे, मुंढे आदि.उपस्थित होते.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !