लिंबागणेश येथे कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर जयंती साजरी ; शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृती श्लोकांना विरोध हिच खरी आदरांजली
---- लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे आज दि.३१ मे शुक्रवार रोजी कर्मयोगीनी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ह.भ.प. अनंतकाका मुळे यांनी अहिल्यामाता यांचा जीवनपट उलगडून सांगताना अहिल्यामाता यांच्या शासन व्यवस्थेच्या कालावधीत अनेक धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार केला.धर्मशाळा रस्ते, दवाखाना यांची निर्मिती करताना वस्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार,सोनार, चर्मकार अशा अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना करवसुलीची मर्यादा निश्चित ठरवून दिली त्यामुळे शेतकऱ्यांना जादा शेतसारा द्यावा लागत नसे.शेती पुर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने तलाव, विहीर घाट,कुंडाची निर्मिती केली.यावेळी बाळासाहेब मुळे रमेश गायकवाड, समीर शेख,नाना वाणी यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन बाळासाहेब मुळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.गण...