शिवरस्ता जेसीबीने खोदून अडवला; तहसिल प्रशासन डोके फुटण्याची वाट बघतंय का? पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील प्रकार
शिवरस्ता जेसीबीने खोदून अडवला; तहसिल प्रशासन डोके फुटण्याची वाट बघतंय का? पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही येथील प्रकार :- डॉ.गणेश ढवळे
पाटोदा:- दि.२६. पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही शिवारातील गट क्रमांक २५४ मधिल वैद्यकिन्ही ते वैजाळा रस्त्यावरुन वैद्यकिन्ही वैजाळा शिवावरुन पश्चिमेकडे जाणारा रस्ता हरिदास सोपान खुळे आणि विक्रम किसन काळे यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन अडवला असुन तक्रारदार पिराजी उत्तमराव शिंदे यांच्या लेखी तक्रारीनंतर वर्षभरापूर्वी पाटोदा मामलेदार न्यायालयात तहसीलदार रुपाली चौगुले यांनी प्रतिवादी यांना वारंवार नोटीस बजावुनही न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने मामलेदार अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार प्राप्त आधिकारांचा वापर करत अर्जदार पिराजी शिंदे यांचा अर्ज अंशतः मान्य करत वैद्यकिन्ही -वैजाळा दोन गावच्या शिवबांधालगतची जमिन उप अधिक्षक भुमी अभिलेख पाटोदा यांच्याकडुन मोजणी करून घेऊन हद्दी खुना निश्चित करून मंडळ अधिकारी दासखेड यांना उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय पाटोदा यांच्या कडुन निश्चित करण्यात आलेल्या हद्दी व खुना नुसार सदरील रस्ता तात्काळ खुला करण्याचे आदेश दि.१७ मे २०२३ रोजी वर्षभरापुर्वीच दिलेले होते मात्र त्याची वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने अखेर प्रकरण हाताघाईवर आले असुन तहसिल प्रशासन नेमकं शेतकऱ्यांच्या डोके फुटाफुटीची वाट पहात आहे की काय असा प्रश्न पडला आहे. आज दि.२६ रविवार रोजी संबंधित प्रकरणी पाटोदा तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांना फोनवरून याची कल्पना दिली असता उद्या मंडळ अधिकारी यांना पाठवुन प्रकरणात लक्ष देतो असे आश्वासन दिले.
६ एक्कर ऊस रस्त्याच्या वादामुळे जागेवरच वाळला:- तक्रारदार पिराजी शिंदे
---
आमच्या बापजाद्यापासुन हा शिवरस्ता अस्तित्वात असुन बेडुकवाडी आणि वैद्यकिन्ही येथील शेतकऱ्यांचा रहदारीचा रस्ता आहे. माझ्या रानात ६ एक्कर ऊस असुन दरवर्षी कारखाना किंवा गु-हाळाला पाठवत असतो परंतु यावर्षी वर्षभरापासून रस्त्याच्या वादामुळे जागेवरच वाळुन गेला असुन ४ लाखाचे वैयक्तिक नुकसान झाले आहे.जिल्हाधिकारी , तहसीलदार यांना वारंवार तक्रारी नंतर तत्कालीन तहसीलदार रुपाली चौगुले यांनी गेल्या वर्षी आदेश देऊनही अद्याप रस्ता खुला करून देण्यात आला नाही.
पाटोदा तहसिल आणि भुमि अभिलेख कार्यालयातील आधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे पाणंद रस्त्यांची प्रकरणे प्रलंबित:- डॉ.गणेश ढवळे
---
पाटोदा तालुक्यातील विविध गावांमधील शिवार रस्ते तसेच पाटोदा शहरातील पाटोदा ते चुंभळी फाटा पाणंद रस्त्यांच्या अतिक्रमण प्रश्न असो तहसिल प्रशासन आणि उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी केवळ वेळकाढूपणा पणाची भुमिका घेताना दिसत आहेत.राजकारणी आणि धनदांडगे यांच्या हातातले बाहुले बनुन सर्वसामान्य लोकांना केवळ कार्यालयाचे हेलपाटे मारायला लाऊन कागदोपत्रीच टोलवाटोलवी करताना दिसत असुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सुद्धा कर्तव्य बजावताना कसुर करत आहेत.कर्तव्यात कसुर करणा-या अधिका-यांवर प्रशासकीय कारवाईची आवश्यकता आहे.
Comments
Post a Comment