अवैध हातभट्टी दारू विक्रीची दुकाने बंद व्हावी या नागरिकांची बैठक
संभाजीनगर व शहर पोलीस ठाणे येथील पी.एस.आय. यांची घेतली शिष्टमंडळाने भेट
परळी प्रतिनिधी - कालरात्री देवी मंदिर परिसरा असलेल्या साठेनगर, भिमनगर या भागात खुले आम, पोलिसांच्या नाकावर टिचुन, राजरोस पणे, मोठ्या प्रमाणात अवैध्य हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असून दहा ते पंधरा जण हा व्यवसाय करतात, या सर्वांची नावे व पत्ते देण्यात आला. या भागातील तरुण स्वस्तातली हातभट्टी दारू पिऊन व्यसनाधीन झाला आहे, यामुळे त्याला अनेक आजार होत आहे, अनेक तरुणांचे संसार उध्वस्त झाले आहे, व्यसनाधीनते मुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे, या अवैद्य हातभट्टी दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी येथील या भागातील सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन जिजामाता उद्यान येथे व्यापक बैठक घेतली. बैठकीमध्ये विचार विनिमय करून, सर्वानुमते तात्काळ हातभट्टी अवैध दारू विक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली. दुपारी ही बैठक पार पडल्यानंतर सायंकाळी सर्वानुमते शिष्टमंडळ परळी शहर पोलीस ठाणे, संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या भेटीसाठी गेले व त्यांनी सविस्तरपणे या भागात होणाऱ्या अवैध हातभट्टी दारू विक्रीची सविस्तर माहिती दिली,पोलीस प्रशासनाने यावर कडक, प्रतिबंधक कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. पोलीस पेट्रोलिंग देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती सांगितली आहे.
साठेनगर,भिमनगर, कालरात्री देवी मंदिर परिसर या ठिकाणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सर्व पक्षीय नेते मंडळींनी केले. त्यामध्ये माजी नगराध्यक्ष वैजनाथ जगतकर, पीआरपीचे नेते सोपान ताटे, वंचित बहुजन आघाडीचे बालाजी जगतकर, भाजपा नेते रमेश गायकवाड,राष्ट्रवादीचे नितीन रोडे, संतोष आदोडे,प्रताप समिंदरसवळे,राज जगतकर, अँड.अर्जून सोळंके,भैय्यासाहेब आदोडे,निलेश वाघमारे,अभिजित कांबळे,जतिन जगतकर, अनंत कांबळे, बबलु साळवे, किरण तरकसे,अतुल आवचारे,साहेबराव कस्बे,महेश मस्के आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment