कु. हार्मीका बालाजी जगतकर हिचे दहावी बोर्ड परिक्षेत उत्तुंग यश
बीड प्रतिनिधी:-तुलसी इंग्लिश स्कुल बीडची विद्यार्थिनी कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने राज्य माध्यमिक शालांत परिक्षेत 91.80 टक्के गुण घेवून प्रथमश्रेणीत येण्याचा बहुमान मिळविला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कु.हार्मीका बालाजी जगतकर हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेमध्ये 91.80% गुण घेऊन उत्तुंग यश संपादित केले आहे. कु.हार्मिका ही तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सौ.उमाताई जगतकर व बीड अक्षरधामचं संपादक प्रा.बालाजी जगतकर यांची कन्या आहे.कु.हार्मिका हिने अथक परिश्रम सातत्यपूर्ण अभ्यास करून घरीच अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.कु. हार्मिका ही खूप गुणवान असून लहानपणापासून विविध स्पर्धा परिक्षेतही तिने यश संपादन केले आहे. कु.हार्मिका हिने इंग्लिश विषयात 71, मराठी 84, हिंदी 84, गणित 93, सोशल अॅण्ड टेक्नॉलॉजी 95, सोशल सायन्स या विषयात 88 मार्क असे 500 पैकी 444 मार्क घेतले आहेत. तिच्या या यशाबद्दल तुलसी इंग्लिश स्कुलच्या प्राचार्या, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment