अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा सिमेंटच्या पाण्याने बुजवण्यास सुरूवात
एचपीएम कंपनीने लाजच सोडली अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेगा सिमेंटच्या पाण्याने बुजवण्यास सुरूवात; थातुरमातुर डागडुजी न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्तीची आवश्यकता :- डॉ.गणेश ढवळे
बीड प्रतिनिधी :- अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते केज दरम्यान येळंबघाट गावाजवळ निकृष्ट कामामुळे मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनचालकांच्या गाड्यांचे चाके फसुन वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असुन संबंधित प्रकरणात तातडीने भेगा बुजवण्याचे दर्जेदार काम करण्यात यावे आणि जबाबदार कंत्राटदार कंपनी एचपीएम इन्फ्रा एल एल पी कंपनीला काळ्या यादीत टाकुन जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत नितिनजी गडकरी, अरविंद काळे, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना केल्यानंतर अपर जिल्हा दंडाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांनी निवेदनाच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना निवेदनातील मुद्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी.असे आदेश काढल्यानंतर अखेर आज रस्ता कामाच्या दुरुस्तीला सुरूवात झाली आहे. मात्र एचपीएम इन्फ्रा कंपनीने नेहमी प्रमाणेच सिमेंट पाणी टाकून थातुरमातुर डागडुजीस सुरूवात केली असुन ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती काम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे एचपीएम कंपनीने लाजच सोडली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
थातुरमातुर डागडुजी न करता ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्तीची आवश्यकता:- डॉ.गणेश ढवळे
अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते नेकनुर दरम्यान गवारी फाट्यावर पडलेल्या भेगांची थातुरमातुर दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा भेगा पडल्या होत्या.शेवटी ब्लॉक कट करून दुरुस्ती करावी लागली त्याचप्रमाणे येळंबघाट येथील भेगांची ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती करण्याची आवश्यकता असुन रखडलेले दुभाजक,पुल, नाल्या आदिंची कामे एचपीएम इन्फ्रा कंपनीने तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी डॉ.गणेन ढवळे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी यांचे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ छत्रपती संभाजी नगर यांना निर्देश
अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते केज दरम्यान येळंबघाट गावाजवळ मोठमोठ्या भेगा पडलेल्या असुन दुचाकी वाहनांचे चाक अडकून अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढले असुन तातडीने भेगाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाद्वारे करून दि.१० जुन रोजी आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर अपर जिल्हादंडाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या.छत्रपती संभाजीनगर यांना निवेदनातील मुद्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.केलेल्या कार्यवाही बाबत संबंधित अर्जदार यांना परस्पर कळवुन त्यांना आंदोलन करणेपासुन तात्काळ परावृत्त करावे असे लेखी निर्देश दिले आहेत.
Comments
Post a Comment