कु. आकांक्षा नितीन जोगदंड हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
बीड दि.२७ (प्रतिनिधी) द.बा.घुमरे, धांडे नगर बीड ची विद्यार्थिनी कु. आकांक्षा नितीन जोगदंड हिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करताना ८९.८०% गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
कु.आकांक्षा नितीन जोगदंड ही बीड योगभूषण चे संपादक नितीन जोगदंड यांची कन्या आहे. तिने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ८९.८० % टक्के मिळवले आहेत. तिच्या या यशासाठी आई अर्चना जोगदंड, आजोबा दिलीप जोगदंड, आजी शकुंतला जोगदंड यांचे विशेष परिश्रम घेतले आहे. आकांक्षा ने कसलीही टिवीशन न लावता अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून हे यश मिळवले आहे. कु.आकांक्षा हिने इंग्रजी या विषयात ८६, मराठी ७९, हिंदी ८२, गणित ९५, सायन्स अँड टेक्नलॉजी ९४ आणि सोशल सायन्स ९२ असे गुण मिळवत एकूण ५०० पैकी ४४९ गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल द.बा.घुमरे शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह सर्व पत्रकार बांधव आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment