दाऊदपूर येथील मागासवर्गीय तरुणांना मारहाण प्रकरणी काचगुंडे बंधुवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
अद्याप आरोपी मोकाट,परळी ग्रामीण च्या पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
परळी प्रतिनिधी - बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील दाऊतपूर या गावात मागासवर्गीय लोकांवरती अन्याय व अत्याचाराची घटना घडली आहे, मागासवर्गीय कुटुंबातील चार युवकाला, जातिवाच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये भादवी 324, 504 ,505, 34,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत 3(1)( r), 3(2)(पाच) तसेच 3(2)(vs) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाऊतपुर येथील गावगुंड ज्यांच्यावर या अगोदर 302 सारखे गुन्हे व औष्णिक विद्युत केंद्रात ब्लास्टींग करण्यासारखे गुन्हे नोंद आहेत. अशा गुंड लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यांना तात्काळ अटक करून योग्य कारवाई मागणी करण्यात आली आहे. दाऊदपुर येथील चार जनावर गुन्हा नोंद झाला आहे त्यातील आरोपी मारुती उत्तम काचगुंडे, ज्ञानदेव बाबुराव काचगुंडे, खंडू उत्तम काचगुंडे, वैजनाथ बाबुराव काचगुंडे व त्यांचे सहकारी यांनी जातिवाचक शिवागाळा करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून अद्याप हे आरोपी मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे.परळी ग्रामीण पोलिसांकडून आरोपीला अभय दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी आकाश आश्रुबा मुंडे यांच्या सह इतर पिडीत कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे. यांच्या जीवितास धोका आहे व यांना जिवे मारण्याची धमकी दिल्या जात आहेत.
ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यासाठी आकाश मुंडे व पिडित तरुणांना जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी लागला, यामध्ये राजकीय दबाव असल्याची माहिती समोर येत आहे. दाऊतपुर येथे या गावगुंडांचा प्रचंड त्रास असून या अगोदर तीन वेळेस मारहाण झाली आहे.आशी माहिती समोर आली आहे. तरी या प्रकरणात बीड पोलीस प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी दाऊतपुर येथील मागासवर्गीय आकाश आश्रुबा मुंडे चे कुंटुंबीय इतर पीडित तीन तरुण करत आहे.
Comments
Post a Comment