लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन
लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील माजी सरपंच अशोक सुंदरराव जाधव ( वय ४४ वर्षे) यांचे आज दि.२८ मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजता बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात निधन झाले. सन २०१२ ते २०१७ दरम्यान लिंबागणेश गावचे उपसरपंच असलेले अशोक जाधव गेल्या २ वर्षांपासून आजारी होते. गुरुवार रोजी अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी ४ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी बेबी,मुलगा शुभम,मुलगी सानिया,भाऊ महावीर,आई शिलावती,वडिल सुंदरराव जाधव असा परीवार आहे.
Comments
Post a Comment