मोफत त्वचारोग तपासणी शिबिर आणि ५०% सूटचा लाभ घ्यावा - डॉ. पूनम भालेराव
बीड (प्रतिनिधी) - शहरातील स्किनोवेशन क्लिनिक, स्किन, हेअर अँड लेसर सेंटर, बी.एच.एम.एस. कॉलेजच्या बाजूस, सिद्धी फोटो स्टुडिओ शेजारी, माने कॉम्प्लेक्स रोड, बीड येथे येत्या शनिवार रोजी दिनांक १ जून २०२४ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत मोफत त्वचारोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिनांक २० जून २०२४ पर्यंत विविध सुविधांवर ५०% सूट ही देण्यात येणार आहे. या शिबिराचा व सूटचा गरजवंत रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. पूनम भालेराव यांनी केले आहे.
या शिबिरामध्ये पिंपल्स (मरूम), वांग, चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्याखालील काळे डाग, कोरडी त्वचा, नखांचे आजार, गजकर्ण, पांढरे डाग (कोड), सोरियासिस, स्ट्रेच मार्क (व्रण), त्वचेचे सर्व आजार, सनटेन ट्रीटमेंट, स्कीन टायटनिंग, केस गळती, केसातील कोंडा, केसांची वाढ खुंटणे, हायड्रोफेशियल (ॲडव्हान्स मशीनद्वारे), मायक्रो नीडलिंग, पी.आर.पी. (केसांसाठी व त्वचेसाठी), लेझर मशीनद्वारे शरीरावरील अनावश्यक केसांसाठी उपचार, टॅटू-गोंदण काढणे, केमिकल पिलिंग, मस-चामखीळ काढणे, इत्यादींची तपासणी शिबिरात मोफत केली जाणार आहे. याकरिता शिबिरात तपासणी करायची असल्यास रुग्णांनी ८०८०९७३५९८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी किंवा शिबिरापूर्वी स्किनोवेशन क्लिनिक, स्किन, हेअर अँड लेसर सेंटर, बी.एच.एम.एस. कॉलेजच्या बाजूस, सिद्धी फोटो स्टुडिओ शेजारी, माने कॉम्प्लेक्स रोड, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधून १ जून रोजी मोफत तपासणी आणि २० जून पर्यंत विविध सुविधांवर ५०% सूट चा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. पूनम भालेराव यांनी केले आहे.
.
Comments
Post a Comment