कामखेडा हायस्कूल चा निकाल शंभर टक्के
बीड (प्रतिनिधी): तालुक्यातील आदर्श शिक्षण संस्था संचलित कामखेडा हायस्कूल कामखेडा, तालुका जिल्हा बीड विद्यालयाने प्रति वर्षाप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयातून एकूण 33 विद्यार्थी बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्यसह 19 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत अकरा विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यालयातून सर्वप्रथम कु. नेवडे कोमल गोकुळ 88.20% सर्व द्वितीय कु. भडके अस्मिता अशोक 87.60% व सर्व तृतीय कु. शिंदे आरती विलास 85.80% घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या उज्वल यशाबद्दल जयदत्त अण्णा क्षीरसागर, रोहित क्षीरसागर, आदर्श शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा.डॉ. राजू मचाले, कार्यकारी अधिकारी राऊत, विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कुऱ्हे, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक मोमीन बिलाल, भांडवलकर, मोरे, लेहने, धापसे, शेख, मचाले, श्रीमती. शेख, श्रीमती राऊत, शिक्षकेत्तर कर्मचारी राऊत, शेख तलहा, सर्व कामखेडा, कांबी, पवार तांडा ग्रामस्थांनी व परिसरातील पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment