तुलसी इंग्लिश स्कुलचा दहावीचा १००% टक्के निकाल
गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर यांनी केले अभिनंदन
बीड, (प्रतिनिधी): येथील देवगिरी प्रतिष्ठान बीड संचलित तुलसी इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १००% टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी १००% टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निकाल खालील प्रमाणे आहे.
प्रथम क्रमांक क्षितिज धनवे ९४.००%, द्वितीय क्रमांक आर्या चव्हाण ९३.८०%, तृतीय हर्मिका जगतकर ९२%, आर्यन कोरडे ९२%,दीक्षा सरपते ९२% तसेच सार्थक पोकळे ९१.८०%, शेख झोया ९१.४०%, निशा मस्के ८९.६०%, कृष्णा दबडे ८९.४०%, जिया लोखंडे ८८.६०% निकाल जाहीर झाला आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदिप रोडे, प्राचार्या उमा जगतकर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment