परचुंडी तालुका परळी वैजनाथचा युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे ‘एमपीएल’मध्ये चमकणार



कोल्हापूर टस्कर संघामध्ये निवड

परळी ता. 29 ः शहरातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू भूषण नावंदे यंदाच्या महाराष्ट्र प्रिमियम लिगमध्ये (एमपीएल) चमकणार आहे. कोल्हापूर टस्कर संघात भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली भूषण खेळणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ‘आयपीएल’च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रिमियम लीगचे गेल्या काही वर्षांपासून आयोजन केले जात आहे. यंदा दोन जूनपासून सुरू होणाऱ्या ‘एमपीएल’मध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजी किंग्ज, ईगल नाशिक टायटन्स, कोल्हापूर टस्कर, पुणेरी बाप्पा, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स संघांचा समावेश आहे. परचुंडी तालुका परळी वैजनाथ येथील भूषण नावंदे याची पुनीत बालन प्रायोजक असलेल्या कोल्हापूर टस्कर या संघामध्ये निवड झाली आहे. केदार जाधव यांच्या नेतृत्वाखालील संघात अंकित बावणे यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यात भूषण याची वर्णी लागली आहे. भूषण याने यापूर्वी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. सय्यद मुश्‍ताक अली सराव शिबिरात त्याची निवड झाली होती. भूषण लंडन येथे क्लब काऊंटी स्पर्धेमध्ये अनेक वेळा क्रिकेट खेळला आहे. त्याने तो ज्येष्ठ फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांचा मुलगा आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी