रितेश क्षीरसागर चे घवघवीत यश
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी -नवनाथ गायकर- यांजकडुन -
घोटी बु!!, ता.ईगतपुरी येथील जनता विदयालयातील विदयार्थी कु.रितेश संतोष क्षीरसागर या इ. १० वी च्या विदयार्थ्याने माध्यमीक शालांत परिक्षेत ९० टक्के गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
घोटी सारख्या आदिवासी, अतिदुर्गम भागात राहुन त्याने हे सुयश प्राप्त केले आहे.विशेष म्हंणजे यासाठी त्याने कुठल्याही खाजगी शिकवणीचा आर्थिक परिस्थितीमुळे आधार घेतला नव्हता.
दरम्यान आपल्या या यशाचे श्रेय रितेश ने आई ललिता व वडिल संतोष यांना दिले आहे. आई वडिलानीं मोल मजुरी करुन रितेश ला शिक्षणासाठी सातत्याने मदत व प्रोत्साहन दिले आहे.
शिक्षिका श्रीमती मनिषा सोनवणे यांचे त्यास विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
पुढे जाऊन आपल्याला संगणकीय क्षेत्रात अभियंता ( साफ्टवेयर इंजिनिअर ) बनायचे स्वप्न असल्याचे रितेशने प्रसारमाध्यमाशी बोलतानां सांगितले.
दरम्यान रितेशचे या योगदानाबद्दल अभिनेते तथा विश्वकर्मा संघटनेचे गणेश बोराडे यांचेसह परिचीत नातेवाईक आदीनीं हार्दिक अभिनंदन केले आहे.
माफक दरात रंगकाम
Comments
Post a Comment