मुख्यमंत्री, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त,खते व बियाणे मुबलक उपलब्ध करा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन
बीड जिल्ह्यातील बोगस व कृत्रिम बियाण्याची व खतांची टंचाई करून विक्री करणाऱ्या घोटाळा खोरांवर नियंत्रण ठेवा
माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी
मुख्यमंत्री, कृषी मंत्री, विभागीय आयुक्त,खते व बियाणे मुबलक उपलब्ध करा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन
बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मुबलक बियाणे खते व अवजारे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जिम्मेदारी आहे परंतु बीड जिल्ह्यातील मागील इतिहास पाहता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे, शेतकऱ्यांना बियाणे बोगस मोठ्या प्रमाणात विकण्यात आले होते व खतेही बोगस देण्यात आलेले आहेत तरी यावरती प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात आलेली नसून यावर्षी ते वेळीच नियोजन करण्यात यावे, शेतकऱ्यांना मागेल त्या कंपनीचे बियाणे देण्यात यावे व मुबलक खते उपलब्ध करून द्यावे , बोगस ब्याने व खत विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे असे आढळल्यास किंवा शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास त्या दुकानावर कंपनीवर किंवा व्यापाऱ्यावर तत्काळ तक्रारीचे निवारण करण्यात यावे मागील वर्षी संपूर्ण खते व बियाणे विकल्यानंतर बोगस खते व बियाणे विकल्याचे उघड केस झालेले आहे असे यावर्षी होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ते नियोजन करावे असे असे निवेदन जिल्हाकृषी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री पालकमंत्री कृषी मंत्री विभागीय आयुक्त यांना निवेदन आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले जर यावरती योग्य ती कारवाई झाली नाही किंवा प्रशासनाने केली नाही तर आपल्या कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलने करण्यात येतील असे निवेदन देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जमले शहर अध्यक्ष सय्यद सादेक तालुका उपाध्यक्ष आजम खान तालुका अल्पसंख्याक विभाग प्रमुख रफिक पठाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment