कन्हेरवाडी येथील फर्निचर चालकाची मुलगी कु.यशश्री देविदास रोडे हिने इयत्ता दहावी मध्ये मुलींमध्ये 94 टक्के गुण घेऊन मिळवला बहुमान

सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथील निकालामध्ये 100 टक्के यशाशी परंपरा कायम

परळी प्रतिनिधी -
परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथील रहिवाशी असलेले रोहिदास देविदास रोडे हे वैष्णवी फर्निचर या नावाने परळी येथे त्यांचे छोटे मोठे लाकडाचे दुकान असून त्यांची मुलगी कुमारी.यशश्री देविदास रोडे ही सोमनाथ विद्यालय कन्हेरवाडी येथे शिक्षण घेत होती यावर्षी इयत्ता दहावी या वर्गामध्ये तिने घवघवीत असे यश संपादित करून मुलींमध्ये 94% घेऊन प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिचा आज 26/05/24 रोजी निकाल लागला असून दहावी या वर्गामध्ये 94% इतके गुण घेऊन घवघवीत यश संपादित केले आहे. 
यशश्री उर्फ पिऊ हिने इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे केलेले असून पुढील शिक्षण पाचवी ते दहावी हे सोमनाथ विद्यालय येथे केले आहे तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री.धुमाळ सर, वर्ग शिक्षक राजूरकर सर,पाटील सर, थोरात सर ,क्षीरसागर सर,शिंदे सर,शेख सर,आंधळे सर,सरवदे सर,शिंदे मॅडम,साखरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज तिला यशाचे शिखर गाठता आले आहे. लहानपणापासूनच ती अत्यंत गुणी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये तत्पर्तने भाग घेऊन शाळेचे नाव लौकिक करण्याचा आणि कुटुंबाचा मान सन्मान वाढेल अशी भावना मनी बाळगून वेळोवेळी यश संपादित केले आहे.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये व घरामध्ये वडिलांशिवाय इतर कुठल्याही व्यक्तीचा कमावता आधार नसल्यामुळे यशश्री हिने मनाशी शिक्षणाची गाठ बांधून ठाम निर्णय घेऊन कुठल्याही कठीण प्रसंगांमध्ये आपले शिक्षण आणि अभ्यास हा थांबता कामा नये याची पुरेपूर खबरदारी घेतल्यामुळे आज ती या यशाच्या शिखरापर्यंत पोहचू शकली आहे.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तथा वर्ग शिक्षक आणि संपूर्ण शाळेचे शिक्षक वृंद यांच्यासह नातेवाईक मित्र परिवार आप्तेष्ट नातेवाईक यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी