कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांचे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतली

कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांचे शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) - जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतली आहे. कब्रस्तान वाचविण्यासाठी असीम जरगर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सर्वे नं. ६२२, ६२३ मौजे धारुर ता. धारुर जि. बीड येथील अकृषी परवानगी नं. २०१२/मशाका/जमा २ अकृषि प/सिआर/ ११ दि.०४.०६.२०१२ रोजीचा अकृषी परवाना रद्द करण्यात यावा. दिलीप हरिनाथ कोमटवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अकृषी परवाना मिळणे बाबत अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या पुर्णपणे चौकशी कार्यवाही झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी कायदेशीर अटी व नियम घालुन देवून दि.०४.०६.२०१२ रोजी अकृषी परवाना मंजुर केला आहे. परंतु सदर अकृषी परवाना मंजुर करतेवेळी संबंधीत महसुल अधिकारी यांनी सदर परवाना देणे बाबत काही अटींची पुर्तता होत नसल्याने त्या खऱ्या व कायदेशीर वस्तुस्थिती लपवल्या आहेत. कारण अकृषी परवानगी मंजुर करतेवेळी अट क्रं. ३ अशी आहे की, प्रस्तावित अकृषी जमीनी जवळ स्मशानभुमी अथवा धार्मिक स्थळ नसावेत अशी मुख्य अट आहे. सर्वे नं. ६२२ मध्ये स्मशानभुमी असताना देखील संबंधीत महसुल अधिकाऱ्यांनी व दिलीप हरिनाथ कोमटवार यांनी ही सत्यपरिस्थिती लपवुन ठेवुन भूमी अभिलेख कार्यालय यांचे मार्फत खोटे नकाशे तयार करुन ते दाखल केले व सत्य परिस्थिती लपवुन ठेवुन सर्वे नं. ६२२ मध्ये असलेली स्मशानभुमी न दाखवता अथवा स्मशानभूमी बाबत कोणतीही कागदोपत्री माहिती न देता सदर अकृषी परवाना घेतला आहे. सदर अकृषी परवाना देणेचे पुर्वी सदर मिळकती जवळ स्मशानभूमी असले बाबतचे कागदोपत्री पुरावे दिलीप कोमटवार यांनी संबंधीत महसुल अधिकारी यांचेशी आपसात संगणमत करुन, मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करुन स्मशानभुमी सर्वे नं. ६२२ मध्ये असताना देखील अकृषी परवाना घेतला आहे. तो परवाना रद्द करणे योग्य, न्यायाचे व जरुरीचे आहे. असे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले असून कब्रस्तानच्या जागेचा देण्यात आलेला अकृषी परवाना रद्द करून कब्रस्तान ची जागा परत कब्रस्तानला देण्यात यावी. अशी मागणी असिम सादेक जरगर यांनी आपल्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर असीम जरगर यांच्यासह मुबीन मुन्शी शेख, अफरोज मैनोद्दीन पठाण, जमील युसूफ खुरेशी यांची नावे व सह्या आहेत.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी