सुरेश कुटे यांना तात्काळ अटक करा-वर्षाताई जगदाळे


बीड... मागील सहा महिन्यापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव अर्बन मल्टीस्टेट चे संचालक सुरेश कुटे यांनी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो ठेवीदारांना फक्त ठेवी परत करण्याचे आश्वासन दिले. नेहमीच ठेवी परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळावर माजलगाव ,नेकनूर व बीड येथे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्यापही पोलीस यंत्रणा सुरेश कुटे यांना अटक करू शकले नाही. निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्या सारखे कुटे पळून जाण्याची वाट बीडची पोलीस यंत्रणा पाहत आहे का. तत्काळ सुरेश कुटे यांच्यासह सर्व संचालकांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना आर्थिक संकटात टाकून नाम निराळे झालेले सहा महिन्यापासून आश्वासन तारीख पे तारीख देणारे सुरेश कुटे यांच्या यांच्या विरोधात 420 कलम सह वित्तीय संस्था मधील हितसंबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. नेकनूर, बीड ,माजलगाव सह इतर ठिकाणीही गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू असून सुरेश कुटे पोलीस यंत्रणेला चकवा देत इतर राज्यात जाऊ शकतात. वेळीच सुरेश कुटे यांच्यासह सर्व संचालक मंडळाला अटक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला राज्य उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांनी केली आहे. बबन शिंदे सारखे सुरेश कुटे ही लापता होऊ शकतात पोलीस यंत्रणा मधील भ्रष्टाचार या अगोदर उघड झाला असून कर्तव्यनिष्ठ व चांगल्या अधिकाऱ्याकडे सुरेश कुटे यांचा तपास द्यावा सुरेश कुटे व अर्चना कुटे यांना अटक करावी अशी मागणी वर्षाताई जगदाळे यांनी केली असून अटक न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी