झाडे लावा झाडे जगवा ही शासकीय योजना न राहता लोकचळवळ झाली पाहिजे:- बळीराम उबाळे
बीड प्रतिनिधी:-
सध्या उन्हाळा एवढा कडक झाला आहे की, गेल्या १०० वर्षात जेवढे उन पडले नव्हते तेवढी उष्णता या वर्षात निर्माण झाली आहे. काही भागात ४० ते ५५ पर्यंत उष्णता चा पारा गेला आहे.व त्यामुळे जवळ जवळ देशातील ६० ते १०० व्यक्तीचा मृत्यू उष्माघतामुळे झाला आहे. उष्णता वाढल्यामुळे सर्वात जास्त नुकसान विद्यार्थ्यांना झाले आहे. कोचिंग क्लासेस व शाळा कॉलेज ला जाणाऱ्या विद्यार्थि यांनायाचा त्रास होत आहे. उष्णतेमुळे शेतमजूर, कामगार विद्यार्थी व सर्व सामान्य माणसे भोवळ येऊन बेशुद्ध पडत आहेत. त्यामुळे दवाखान्याच्या तान वाढला आहे.
शेतकऱ्यांची कामेही या उष्णतेमुळे रखडली आहेत.
मित्रहो तुम्हाला पुढील नवतरुण व लहान बालकांना जिवंत ठेवायचे असतील तर प्रत्येकानी कमीत कमी २० झाडे लावण्याची व ती जगवण्याची हमी प्रत्येक गावातील, शहरातील नागरिकांनी घेतली पाहिजे त्या शिवाय वातावरणात बदल घडणार नाही.
झाडे ही उष्णता ,पाणी याचे शोषण करतात त्यामुळे जमिनीची धूप न होता ओलावा, थंडावा निर्माण होतो.
व जमिनीत पाणी साठवण क्षमता वाढते.
शासनाने तर प्रत्येक वेळेस झाडे लावून झाडे जगवत आहेत परंतु ते कमी प्रमाणात होत आहेत.
त्यामुळे आपणही सामाजिक बांधिलकी समजून ज्या भागात राहतो त्या प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे त्यांनी झाडे लावून ती झाडे जगवण्याची शपथ घेतली पाहिजे. तरच आपली भावी पिढी वाचेल नसता उष्णतेमुळे मानवाचे जीवनमान धोक्यात येईल.
त्याला कुलर, पंखा हे थंडगार करणारे यंत्र हे काहीही करू शकणार नाहीत. त्याकरिता मित्रहो निसर्गाचा रहास थांवण्यासाठी पर्तेकाने झाडे लावा झाडे जगवा ही शासकीय योजना कडे न पाहता लोकचळवळ करून प्रत्येकाने या पावसाळयात झाडे लावून देशाला व राज्यातील भावी तरुण पिढी ला वाचवावे.
असे कळकळीचे आव्हान बीड जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ चे वतीने जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, उपाध्यक्ष अशोक चव्हाण, सचिव नंदकिशोर परळकर, कार्याध्यक्ष शिवलाल राठोड, कोषाध्यक्ष उमेश हुलजुते, आरोग्य अध्यक्ष आशाताई धुतमल, म अध्यक्ष रेखा कवडे, सलागर भागवत वाघ, प्रसिध्दी प्रमुख मकरध्वज सावंत , संघटक विलास बहिरवाळ, उत्त्रेश्र्वर जाधव, आरोग्य भारत नागरगोजे, सहसचिव प्रदीप बनकर असे महासंघाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे युसुफ पठाण यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment