बीड जिल्ह्याच्या तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात-जगताप, मुळूक




शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन



बीड, प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम पुढाकार घेणारे बीड शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाईवर आणि जनावरांच्या चाऱ्याची जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात यासाठी आज दि. 30 में रोजी दुपारी 1.00 वाजताच्या दरम्यान बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन दिले. याबरोबरच सध्या बीड जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेला पाणी टंचाई तथा जनावरांच्या चाऱ्यासाठी करावी लागत असलेल्या भटकंती बाबत अडचणी मांडल्या. याबरोबरच पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील आणि तातडीने या गंभीर प्रश्नाचे कसे निवारण करता येईल याबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी शिवसेनेच्या वतीने अनिलदादा जगताप आणि सचिन मुळूक यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यावर प्रशासनाकडून गंभीर्याने दखल घेण्यात येळ आणि सामान्य जनतेला होत असलेल्या पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची तातडीने व्यवस्था करेल असे सांगितले. सध्या टँकर गावागावात टँकर व्यवस्था सुरु असून गावागावात होणाऱ्या टँकरच्या खेपा याची तपासणी सुरु असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

   शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप तथा सचिन मुळूक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हंटले की, बीड शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. बीड शहरात 20 ते 22 दिवसाला पाणी येत असल्याने पाणी वितरण प्रणालीत सुधारणा करणे आवश्यक आहे. बीड शहरातील पाणी पुरवठा हा किमान आठ दिवसाला करण्यात यावा. या बाबत नगर परिषद प्रशासनाला तातडीने सूचना देण्यात याव्यात व ग्रामीण भागातील टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. ग्रामीण भागात पाणी टंचाई दुर करण्यासाठी इंधन विहिरी घेणे आवश्यक आहे. परंतु इंधन विहिरींचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. पण वरिष्ठ व कनिष्ठ भुवैज्ञानिक यांच्या जागा रिक्त असल्यामुळे इंधन विहिरींचे सर्वेक्षण होत नाही. बीड जिल्ह्यातील प्रकल्पातील बुडित क्षेत्रात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या करीता तातडीने विहिरी सुरु करण्यात याव्यात. या करीता पंचायत समिती प्रशासनाला सुचना देण्यात याव्यात. तरी वरील सर्व बाबीवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती आहे. याबरोबरच बीड जिल्ह्यातही सध्या तीव्र पाणी टंचाई सुरु असून शासना मार्फत टंचाई ग्रस्त गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून मंजूर टँकरची संख्या व टँकर द्वारे करण्यात येणार्‍या खेपा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे. टँकर मंजूर असलेली संख्या व मंजूर खेपा गाव निहाय टाकण्यात येत नाहीत. जी.पी.एस. प्रणाली टँकरला बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे टँकरचे लोकेशन मिळत नाही. यामुळे पाणी पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात गैर व्यवस्थापन निर्माण झालेले आहे. यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गावागावात पाणीपुरवठा करण्यासाठी जाणाऱ्या टँकरला जी.पी.एस. प्रणाली बसवून घ्यावी. जनते बरोबरच ग्रामीण भागातील जनावरांनाही मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे सध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाणी टंचाईबरोबर सध्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात उद्भवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जनावरांच्या चाऱ्याची देखील व्यवस्था करावी असे नमूद केले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक यांच्यासह श्यामभाऊ पडुळे उप सभापती बाजार समिती बीड, सुनील अनभुले बीड विधानसभा प्रमुख, सुनील सुरवसे जिल्हा संघटक, संतोष जाधव उप जिल्हप्रमुख बीड, दीपक काळे जिल्हा सह समन्वयक, सुदर्शन धांडे माजी शहरप्रमुख, हनुमंत पांडे उप शहर प्रमुख, किशोर जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य, सुरेश तात्या शेटे, आकाश वडमारे मुकुंद भालेकर माजी नगरसेवक, सुनील गवते पाटील, गौरव वायभट, लखन घोलप, ओम राऊत याबरोबरच शिवसैनिक तथा इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी