कु.स्नेहल विष्णु मुंडे हिने 10 बोर्डाच्या परीक्षेत 97 टक्के गुण घेत यश संपादन



परळी प्रतिनिधी - राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत टोकवाडी गावची रहिवासी व विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. स्नेहल विष्णू मुंडे हिने 97 टक्के गुण घेत दहावी बोर्डाच्या परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. कु.स्नेहल विष्णु मुंडे ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थीनी आहे. तिने शालेय स्तरावर अनेक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. जिद्द मेहनत, चिकाटी च्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. विद्यावर्धिनी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्यपूर्ण अभ्यास करत हे यश संपादन केले आहे. तिने मिळवलेले गुण पुढील प्रमाणे मराठी 92 संस्कृत 97 इंग्रजी 92 गणित 96 विज्ञान 96 समाज विज्ञान 94 गुण मिळवले आहेत, एकूण 500 गुणा पैकी तिला 475 + 10 एकूण 97% गुण मिळवलेले आहेत. तिचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.व तिला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देखील देण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी