लिंबागणेश येथे कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर जयंती साजरी ; शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृती श्लोकांना विरोध हिच खरी आदरांजली

----
लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे आज दि.३१ मे शुक्रवार रोजी कर्मयोगीनी पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची त्रिशताब्दी जयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.ह.भ.प. अनंतकाका मुळे यांनी अहिल्यामाता यांचा जीवनपट उलगडून सांगताना अहिल्यामाता यांच्या शासन व्यवस्थेच्या कालावधीत अनेक धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार केला.धर्मशाळा रस्ते, दवाखाना यांची निर्मिती करताना वस्तुशिल्पी, शिल्पकार, गवंडी, लोहार, सुतार,सोनार, चर्मकार अशा अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना करवसुलीची मर्यादा निश्चित ठरवून दिली त्यामुळे शेतकऱ्यांना जादा शेतसारा द्यावा लागत नसे.शेती पुर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने तलाव, विहीर घाट,कुंडाची निर्मिती केली.यावेळी बाळासाहेब मुळे रमेश गायकवाड, समीर शेख,नाना वाणी यांची समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन बाळासाहेब मुळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.गणेश ढवळे यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालय ते पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर चौकापर्यंत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढत अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले. घोषणांनी परीसर दुमदुमला होता.यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात,ग्रां.स.श्रीहरी निर्मळ,दामु थोरात,महादेव कुदळे, अर्जुन घोलप,अशोक जाधव, जीवन मुळे,कल्याण वाणी, भगवान मोरे, रामचंद्र मुळे, भालचंद्र गिरे, अँड.गणेश वाणी, सुखदेव वाणी,गणपत तागड, संतोष भोसले,रामदास मुळे, शिवाजी वाणी,दादा गायकवाड ,संजय घोलप, सुरेश ढवळे,संदिप मुळे,नवनाथ मुळे,श्याम गिरे, विशाल लगास,शहादेव धलपे , रामकिसन गहिरे,शुभम कोकाटे, विनायक वाणी,सुदाम गिरे, रामचंद्र गिरे, चंद्रकांत आवसरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृती श्लोकांना विरोध हिच खरी अहिल्यामातेला आदरांजली:- डॉ.गणेश ढवळे 
---
अहिल्यामाता होळकर यांनी राज्यकारभार चालवताना अनिष्ट रूढी , समाजविघातक परंपरा यांना पायबंद घातला. सती प्रथा बालविवाह ,केशवपन या अनिष्ट प्रथा त्यांनी बंद केल्या.त्यासाठी कठोर कायदे करून अंमलबजावणी केली अहिल्यादेवींच्या विचारांचा आणि कार्याचा दैदिप्यमान वारसा सांभाळत वाटचाल करताना ज्या मनुस्मृतीत बहुजण समाजावर आणि महिलांवर अन्याय करणारे श्लोक आहेत ज्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते त्या मनुस्मृतीच्या श्लोकांचा महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट करण्यात यावेत या प्रस्तावाला कडाडून विरोध करणे हिच पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांना आदरांजली ठरेल असे प्रतिपादन केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी