सफाई कामगारांचे शोषण करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईसाठी नवी मुंबईत अर्ध नग्न आंदोलन सुरू
(मुंबई प्रतिनिधी) राज्यातील 337 नगरपरिषद नगरपंचायत व 29 महानगरपालिका मध्ये घनकचरा व्यवस्थापनातील कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात कंत्राटी सफाई कामगार व इतर कामगारांचे बेकायदेशीर शोषण चालू आहे. या संदर्भात सतत आंदोलन केली तरी कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळत नाही. मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या कार्यालयासमोर भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या भारत सरकार मान्यता प्राप्त सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रदेश अध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकर मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली अर्ध लग्न आंदोलनाला सुरुवात केली, असल्याची माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की यासंदर्भात बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद / नगरपंचायत सह राज्यातील सर्व 337 नगरपरिषद/ नगरपंचायत व 29 महानगरपालिकेत अपात्र /बोगस कंत्राटदारांना कामे दिली जातात, ते किमान वेतनासह प्रचलित कामगार कायद्याचे तसेच शासन परिपत्रक, शासन निर्णय,मा.न्यायालयाचे निकाल /आदेशाची अंमलबजावणी न करता कंत्राटी कामगारांचे शोषण करत आहेत. तर या सर्व बोगस /भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदार यांना पाठीशी घालण्याचे महापाप काम संबंधित अधिकारी व कर्मचारी करत आहेत. हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आण्यासाठी दिनांक 27 मे 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक भाऊसाहेब रघुनाथ कांबळे, प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकर, मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर ,अनिल ठोंबरे , काशिनाथ पांचांगे हे मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचनालय सीबीडी बेलापूर नवी मुंबई या कार्यालयासमोर अर्ध नग्न सत्याग्रह करत आहेत. अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment