बीड शहरात दोन हजार वृक्षांची लागवड करणार- अनिलदादा जगताप
गणपती नगर भागात अखंड हरिनाम सप्ताहा मोठ्या उत्सहात संपन्न
बीड, प्रतिनिधी -
भरकटलेल्या समाजाला, माणसांना दिशा देण्याचे काम संत-महंत आणि महाराजांसारखी माणसं करतात. महाराजांच्या सांगण्यावरून आज या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता वृक्षारोपण करून होत आहे. आज आपण पाहतोय सर्वत्र वाढत्या उन्हामुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिकडं पाहावं तिकडं पाण्याची समस्या उद्भवली आहे. तापमानाचा पारा 43 डिग्रीवर जाऊन पोहचला आहे आणि हा पारा भविष्यात देखील वाढत जाणारा आहे. एका मर्यादेपर्यंतच माणूस तापमान सहन करू शकतो. त्यामुळे वाढत्या तापमानाला आळा घालण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. म्हणून प्रत्येकाने झाड लावणे आणि ते जगवने काळाची गरज आहे. अध्यात्मच्या या पवित्र वातावरणात महाराज आणि माता माऊलींच्या साक्षीने मी संकल्प करतो की, येणाऱ्या काळात आम्ही बीड शहरात दोन हजार झाडांची लागवड करणार आहोत आणि ती झाड जगवणार देखील आहोत.
काल दि. 27 रोजी बीड शहरातील गणपती नगर भागात वैकुंठवासी गुरूवर्य ह.भ.प. बंकटस्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त बेलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी कीर्तनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांनी उपस्थित राहुन ह.भ.प.वसंत महाराज यांचे दर्शन घेतले. त्यांच्या कीर्तनाचे श्रवण करत उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला. यानंतर लागलीच बेलेश्वर मंदिराजवळ सर्वांनी एकत्रित येऊन वृक्षारोपण केले. यादरम्यानच अनिलदादा जगताप यांनी येणाऱ्या काळात बीड शहरात दोन हजार झाडांची लागवड करणार असल्याची घोषणा केली. पुढे बोलताना अनिलदादा जगताप म्हणाले की, पंढरीची वारी करणाऱ्या माता-भगिनींच्या आणि महाराजांच्या आशीर्वाद अध्यात्मची शक्ती आपल्या सर्वांच्या पाठीमागे असल्यामुळे आपण प्रत्येक संकटाशी दोन हात करू शकतो. कीर्तनामध्ये सातत्याने माता माऊल्या आणि वडीलधारी मंडळी यांची उपस्थिती दिसून येते. मात्र आता कीर्तनामध्ये तरुणांची हजेरी लागणं काळाची गरज आहे.
बेलेश्वर मंदिराचे संपूर्ण ट्रस्ट गेल्या 26 वर्षांपासून अखंडित बेलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनी या सप्ताहाचे आयोजन करत आहे याचे विशेष कौतुक वाटते. अध्यक्ष अशोक पिंगळे, उपाध्यक्ष विलास घोडके, कोषाध्यक्ष असुरबा घरत, सचिव महारुद्र शेळके यांच्यासह आदी सदस्यांच्या माध्यमातून गणपती नगर, स्वराज्य नगर, बलभीम कॉलनी, बंकटस्वामी नगर, माऊली कॉलनी येथे अध्यात्मिक विचारांची जोपासना केली जात आहे. अध्यात्मिक विचारसरणीच्या मंडळींमध्ये उपस्थित राहून आत्मिक समाधान भेटल्याचे देखील अनिलदादा जगताप यांनी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळूक, गणपती नगर, स्वराज्य नगर, बलभीम कॉलनी, बंकटस्वामी नगर, माऊली कॉलनी या भागातून महिला भगिनी तथा ज्येष्ठांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
माफक दरात रंगकाम करून मिळेल 👇👇👇
Comments
Post a Comment