गटविकास अधिकाऱ्यांकडून कायद्याचं उल्लंघन खाजगी गाडीवर लिहिले महाराष्ट्र शासन असे नाव
कायद्याचं उल्लंघन करणारा वर कायदेशीर तात्काळ कारवाई करा-महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर
आष्टी ( प्रतिनिधी --गोरख मोरे ) :
शासनामार्फत अधिकारी / कर्मचाऱ्यांना वाहने उपलब्ध करून देण्यात येत असली तरी , काही कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांकडून खाजगी वाहनावर सरकारी नावाच्या पाट्यांचा सर्रास दुरुपयोग होताना दिसून येत आहे .
आष्टी येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेंद्र गरजे हे देखील याला अपवाद नसून ते आष्टी पंचायत समितीमध्ये रुजू झाल्यापासून सरकारी वाहन उपलब्ध असूनही खाजगी वाहनाचा वापर करून महाराष्ट्र शासन या नावाची पाटी लावून मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी वाहनावर सरकारी नावाची पाठी वापरण्यास सक्त मनाई असताना सुद्धा नियमचा भंग करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आपल्या स्वतःच्या मालकीची खाजगी गाडीवर , गाडी क्रमांक एम एच २३ ए ३७ ७३ या गाडीवर महाराष्ट्र शासन नावाची पाटी लावून गटविकास अधिकारी राजेंद्र गरजे हे तालुका बाहेर व तालुक्यामध्ये या खाजगी वाहनाचा वापर करून वाहन कायद्याचं उल्लंघन करीत आहेत . संबंधित गटविकास अधिकारी राजेंद्र गरजे यांच्या वाहनावर वाहन अधिनियम १९८८ नुसार कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकारी यांना , आष्टी तहसीलदार मार्फत निवेदन देऊन , तात्काळ कारवाईची मागणी केली आहे .
Comments
Post a Comment