बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपानिमित्त परळी शहरात भव्य धम्म रॅली संपन्न:
परळी प्रतिनिधी
परळी येथील भिमवाडीच्या त्रिरत्न बौद्ध विहारात गेली आषाढ पोर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत या वर्षावासा निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे धम्म उपासीका रजनी गौतम आगळे यांनी त्रिरत्न बौद्ध विहारात नियमीत सायंकाळी ०७ ते ०८ वाजेपर्यंत पठन केले, तर सर्व महिला मंडळानी ग्रंथ समजून घेतला. अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची परळी शहरातून शांतता प्रिय भव्य मिरवणूक काढण्यात आली.
महामानव आंबेडकरांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे बौद्ध समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी येथील
भिमवाडीच्या त्रिरत्न बौद्ध विहारात रजनी गौतम आगळे यांनी सतत तीन महिने वाचन केले. सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . तथागत गौतम बुद्ध व महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्रिशरण पंचशील घेण्यात आले. त्या नंतर अश्वरथावर भव्य बुध्दाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये उपासक, उपासिका व लहान अबाल वृद्धानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठा सहभाग नोंदवला होता. हातात पंचशील, निळे ध्वज मुखाने त्रिशरण पंचशील म्हणत हि मिरवणूक मार्गक्रमण करत भिमवाडी चौक, राणी लक्ष्मीबाई टावर येथून रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन भिमवाडी येथे या मिरवणुकीची उत्साहात सांगता करण्यात आली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमवाडी मित्र मंडळ तसेच त्रिरत्न बौध्द विहार महिला मंडळाच्या सर्वश्री महानंदा व्हावळे, छाया रायभोळे , सुमनबाई व्हावळे, ललिता रायभोळे ,वैशाली ताटे , जाधव ताई, भुमिका कांबळे, सुनीता ताटे, शिवकन्या धाटे, कमलबाई व्हावळे,सुनीता लांडगे , लताबाई व्हावळे,कावेरीबाई रोडे , सुबाबाई सावंत, दैवा गोरे , संगिता रोडे, रेखा मस्के इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. या सर्वांनी बौद्ध उपासीका रजनी गौतम आगळे यांचा पांढरी साडी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. तर त्या नंतर सर्व बौद्ध उपासक, उपासिका यांना अन्नदान करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशी माहिती बौद्ध उपासक तथा बौद्धाचार्य गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Comments
Post a Comment