रंजना सानप यांना मैत्रा फाउंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
.
जि. प. प्राथमिक शाळा सुर्याचीवाडी शाळेतील शिक्षिका रंजना सानप यांना बीडच्या मैत्रा फाऊंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. सानप यांनी वीस वर्षाच्या शैक्षणिक सेवेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम रावबून शालेय गुणवत्ता वाढवली आहे.शैक्षणिक क्षेत्राबरोबर साहित्यिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.त्याची स्वालिखित चार पुस्तके प्रकाशित असून दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गांवर आहेत. सातारा आकाशवाणी, कोकण नाऊ चेंनल वर कथा, कवितांचे सादरीकरण झाले आहे.राज्यभरातील विविध वर्तमानपत्रात त्यांचेतीनशेहुन अधिक लेख,कथा, कविता प्रकाशित झाल्या आहेत.
बीडच्या मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक द.ल. वारे, हर्षा ढाकणे, शितल गायकवाड, जिल्हाध्यक्ष संजय राठोड, उद्धव बडे यांनी सानप यांची निवड केली. आतापर्यंत सानप यांना शैक्षणिक व साहित्यिक कामासाठी चाळीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्कार निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment