वैजाळा येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास सुरुवात
मराठा समाजाला आरक्षण मिळेत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व वैजाळयात निवडणूक होऊन देणार नाहीत- सरपंच भाऊसाहेब भराटे
पाटोदा (प्रतिनिधी) सरकारला मराठा समाजाने आरक्षणसाठी वेळ दिला तो संपल्यामुळे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी याठिकाणी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाला पाठिंबा म्हणून गुरूवारी 26 आक्टोबर पासून सकल मराठा समाज वैजाळा यांचे विश्वासघाती सरकार विरोधात व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वैजाळा सकल मराठा समाजाचे आज दि.२6 आक्टोबर पासून उपोषणाला सुरुवात केली असुन यादरम्यान सर्वपक्षीय राजकीय पुढा-यांना गावबंदी करण्यात आली असुन तशा प्रकारचे निवेदन ही देण्यात आले आहे.माझी सरपंच भाऊसाहेब भराटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत श्रीफळ फोडुन वैजाळा गावात उपोषणाला सुरुवात करण्यात आली यावेळी वैजाळा गावातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधी मराठा कुणबी आरक्षण संदर्भात स्पष्ट भुमिका न मांडल्याने तसेच महाराष्ट्र सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे यांच्या निषेधार्थ वैजाळा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्यात आला असून सर्वच पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांना वैजाळा गावबंदी केली आहे.
Comments
Post a Comment