के के वाघ विद्याभवनाचा प्रथमेश पवार राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र
भाऊसाहेबनगर-ता.२९- नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या (१७ वर्ष वयोगट) शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत के के वाघ विद्याभवन व ज्युनिअर कॉलेज भाऊसाहेबनगर येथील इयत्ता १० वी चा खेळाडू प्रथमेश पवार याने विभागीय तलवारबाजी स्पर्धेत स्वतःचे कौशल्य पणाला लावून यश संपादन केले व तृतीय क्रमांक मिळविला.त्यामुळे त्याची गोंदिया येथील जिल्हा क्रीडासंकुल येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तलवार बाजी स्पर्धेसाठी निवड झाली.त्याबद्दल त्याचे व त्याचे क्रीडा मार्गदर्शक क्रीडाविभाग प्रमुख गोविंद कांदळकर,क्रीडाशिक्षक डि.के.मोरे यांचे के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीरदादा वाघ,सचिव के.एस.बंदी,विश्वस्त शकुंतलाताई वाघ,डॉ.व्यंकटेश माने,के के वाघ शिक्षण संस्था, जनसंपर्कप्रमुख अजिंक्य दादा वाघ,सौ.अवंतिकाताई वाघ,माजी प्रा.शिवाजी नाठे, प्राचार्य अशोक बस्ते,समन्वयक यशवंत ढगे,वर्गशिक्षिका गायत्री रत्नपारखी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment