लिबागणेश येथील शेतकरी रमेश घोलप यांची ५ लाखाची सोयाबीन जळुन खाक
लिंबागणेश:- बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथील शेतकरी रमेश बाबुराव घोलप यांची घोलपवस्ती गट नंबर २०८ मधील १४ एक्कर मधील गोळा करून ठेवलेली सोयाबीन जळुन खाक झाली असुन अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दि.२८ आक्टोबर शनिवार रोजी पहाटे ५ वाजता लिंबागणेश येथील शेतकरी रमेश बाबुराव घोलप यांनी १४ एक्कर शेतामधील सोयाबीन काढुन गंज लावलेली होती.पहाटे ५ वाजता त्यांचे मोठे बंधू सतिश बाबुराव घोलप यांना सोयाबीन गंज गोळा केलेल्या शेतातुन आगीचे लोळ दिसले.घटनास्थळी शेतकऱ्यांनी धाव घेतली असता सोयाबीनच्या गजीने पेट घेतलेला दिसुन आला.आजुबाजुला कुठेही विजेची तारेचा संबंध नसल्याने जाणिवपूर्वक सोयाबीन पेटवुन दिल्याचा संशय व्यक्त केला.
डॉ.गणेश ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन व्हिडिओ व फोटोसह तहसीलदार हजारे व नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनी विलास हजारे यांना फोनवरून कल्पना दिली. एकुण १०० क्विंटल सोयाबीनचे अंदाजे ५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
कष्टाची राख झाली:- निलावती घोलप(रमेश घोलप यांची आई)
दुष्काळात नातवांनी आम्ही कष्ट काबाड करुन सोयाबीन गोळा केलती.असा दुष्मन दावा साधायचा नव्हता, लेकराबाळांनी केलेल्या कष्टाची राख झाली.
Comments
Post a Comment