स्वराज्य शिक्षक संघाची राज्य कार्यकारणी जाहीर


  राज्याध्यक्षपदी ज्ञानेशभाई चव्हाण/प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेळके/राज्य कार्याध्यक्षपदी दत्तात्रय चव्हाण /राज्यप्रसिद्धी प्रमुखपदी गणेश गुजर यांची नियुक्ती

बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : 
  गेल्या वीस वर्षापासुन महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबततीत सातत्याने प्रत्येक शासन अन्यायकारक निर्णय लादत आहेत.शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी पक्ष व राजकारण विरहीत शिक्षक संघटना स्थापन करणेबाबत नुकतीच बैठक पार पडून ,विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्य शिक्षक संघाची राज्यकार्यकारणी संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. यावेळी एकमुखाने, सर्वानुमते, बिनविरोधपणे राज्याध्यक्षपदी श्री ज्ञानेशभाई चव्हाण जालना यांची निवड करण्यात आली .
  तसेच प्रदेशाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेळके मुंबई, महासचिव शंकर शेरे जालना, राज्य कार्याध्यक्ष दत्तात्रय चव्हाण बीड, उपाध्यक्ष गिरीश मखमले बुलडाणा, प्रभाकर इचुरकर जळगाव, महाडिक, यतीन पाटील मुंबई, प्रदेश सचिव अंकुश शेंडोकार अकोला, राज्यप्रवक्ता विजय सुराशे जालना, संघटक गणेश सुराशे, कोषाध्यक्ष संजय बडक संभाजीनगर, सहकोषाध्यक्ष सचिन तोतत्रे पुणे, सहसचिव अमोगसिद्ध बिराजदार सोलापूर, नरेंद्र वाणी, शिगवण, सहारे, राज्य प्रसिद्धि प्रमुख अविनाश देशमुख सिल्लोड, संदीप बढे मुंबई, गणेश गुजर बीड इत्यादी पदाधिकारी यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण यांनी नियुक्तीपत्र दिले.
शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे मत सर्व नवनिवार्चित पदाधिकारी यांनी बोलताना व्यक्त केले.तर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शिक्षकांचे प्रश्न निर्भीडपणे सोडवण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध असून आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे मत सर्व नवनिवार्चित पदाधिकारी यांनी बोलताना व्यक्त केले.तर नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी