वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ
-डॉ.अनिल पवार व डॉ. गणेश डोळे यांनी उभारले शहरात भव्य हॉस्पिटल
-वेलनेस मल्टीस्पेशालिटी डॉस्पिटलचा बीडकरांना होणार फायदा - माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ विजयादशीच्या शुभमुहूर्तावर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा येथील गरजू रुग्णांना मोठा फायदा होईल. डॉ.अनिल पवार व डॉ. गणेश डोळे यांनी एकत्र येत सुरु केलेले हॉस्पिटल बीडकरांसाठी मदतीचे ठरेल अशा विश्वास माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
शहरातील शिवराज पान सेंटर समोर वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची भव्य शुभारंभ मंगळवारी (ता. 24) अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जेष्ठ नेते डाके नाना, माजीनगरसेवक विलास विधाते, श्री चव्हाण, जालिंदर धांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अनिल पवार व डॉ. गणेश डोळे या दोन युवा डॉक्टांनी एकत्र येत या हॉस्पिटलची सुरुवात केली. विशेष म्हणजे हे दोन्हीही युवा डॉक्टर बाहेर जिल्ह्यात जाऊन सुद्धा खुप काही करु शकले असते. परंतू या दोघांही बीड जिल्ह्यात रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भविष्यात बीडकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. कार्यक्रमात बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, या हॉस्पिटलमुळे रुग्णांना एकाच छताखाली अनेक उपचार मिळणार आहेत. यासह तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णांना चांगले उपचार मिळतील असे मत व्यक्त केले.
Comments
Post a Comment