छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौऱ्याचा बाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक संपन्न


छत्रपती संभाजी राजे यांचा नाशिक दौऱ्याचा बाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण   प्रमुख शिलेदारांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आढावा बैठक व नियोजन बैठक आयोजित केली होती या बैठकीचे प्रास्ताविक उमेश शिंदे सर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी सर्वात प्रथम उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून आलेले शिलेदार यांचे शब्दसुमनाने स्वागत करून बैठकीचं आयोजन नियोजन कुठल्या मुद्द्यांवर करण्यात आलं ते व्यवस्थित सर्वांना त्यावर मार्गदर्शन करून स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या ,महापुरुषांच्या,थोर साधुसंत यांच्या पवित्र आणि मराठमोळ्या मर्द मावळ्यांच्या, बहुजन समाज अठरापगड जातीच्या सर्वच क्षेत्रातील तळागाळातील वंचीत, कष्टकरी ,दिनदुबळ्या, श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून तयार झालेले हे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आजपर्यंत विविध पक्ष ,समूह असतील यांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ते म्हणुन काम करण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणावं असं यश मिळाले नाही .कारण छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे लोकशाहीमध्ये टिकवण्याचं काम या राज्यकर्त्यांचं असताना केवळ स्वार्थापोटी कष्टकरी गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःच्या पक्षाचं आणि स्वतःच्या घराचं चांगभलं करून घेण्यामध्येच या प्रस्थापितांनी प्राधान्य दिले. त्याचमुळे आज महाराष्ट्र हे महा पिछाडीवर नेण्याचं काम ,अशी परिस्थिती प्रस्थापितांनी निर्माण करून ठेवलेली आहे. म्हणूनच प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्यासाठी स्वराज्य पक्षाने विडा उचललेला आहे आणि तो सार्थ करण्याचा मान नाशिक जिल्हा हा अग्रक्रमाने घेणारा याही आधी होता आणि याही पुढे राहील यासाठी उपस्थित सर्व आपण छत्रपती संभाजीराजे जेही काही जबाबदारी देतील त्यांच्या आदेशाचे पालन करून आपण पुढील दौरा यशस्वी करायचा आहे त्याचप्रमाणे येऊ घातलेल्या लोकसभा असेल विधानसभा असेल यांच्यावर देखील आपल्याला कटाक्षाने लक्ष देऊन छत्रपतींचे स्वराज्य हे सुराज्य कसे होईल यासाठी छत्रपतींच्या आदेशाचे पालन करून पुढील वाटचाल स्वराज्याचे सर्व शिलेदारांनी करायची आहे असा ठाम आपण आपल्या कामातून छत्रपती संभाजी राजे यांना करून द्यायचा आहे ही जबाबदारी आपण सर्वांनी आपल्या खांद्यावर सार्थपणे पेलण्यासाठी तितक्याच ताकतीने आणि जोमाने पुढील वाटचाल कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न ठेवता कर्ण हे आपल्या सर्वांचे कम प्राप्त कर्तव्य असून त्यावर सर्वजण खरे ठरतील अशी अपेक्षा ठेवून सर्वांचं सर्वांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आलं .
त्यानंतर उपस्थित अनेक स्वराज्याच्या शिलेदारांनी आपल्या मतांना वाट मोकळी करून दिली त्याचप्रमाणे सर्वांना पुढील वाटचाली आणि नियोजनाच्याबाबतच बोलण्याच्या सूचना दिल्या असल्याने सर्वांनी छत्रपतींचा हा दौरा न भूतो न भविष्य अशा आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा करण्याचा निर्धार या ठिकाणी सर्वांच्याच मनातून तशा भूमिका या ठिकाणी व्यक्त करण्यात आल्या.
महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी देखील महिलांच्या प्रति त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा असतील महिलांचं सबलीकरण असेल संरक्षणाच्या बाबतीत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याबाबत देखील प्रत्येक युवतीला स्वसंरक्षणाच्या बाबत धडे देण्याचे काम देखील स्वराज्याच्या मार्फत करण्यात येईल त्याचाही शुभारंभ राजांच्या पुढील दौऱ्यामध्ये करण्याचा निर्धार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला .

जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांनी मनोगत व्यक्त करताना मागील काही घडामोडी घडल्या त्या बाबत जास्तीत जास्त खोलात न जाता युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी मला काही सूचना दिल्या त्या सूचनांना आदेशाला मी नतमस्तक होऊन छत्रपतींना भविष्यामध्ये हे स्वराज्य स्वराज्य म्हणून घडवायचं आहे यासाठी आपण आपले काम सोप पद्धतीने करत राहणे आणि वाटचाल आपली यशस्वी करणे हा मूलमंत्र आपण सर्वांनी आपल्या अंगाशी वाळवून पुढील दौरा यशस्वी करण्यासाठी विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या आहे त्यांचे निश्चिती करून त्र्यंबक राजाच्या दर्शनाने नाशिक जिल्ह्याची मोहीम आहे ती कुठेही न थांबता अजून त्याच ताकतीने नवे नवे दुप्पट ताकतीने कशी पुढे सरकेल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावा आणि निश्चितच पुढील काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य पक्ष हा संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली काम काम करत असताना नाशिक जिल्हा हा नेहमीप्रमाणे अग्रेसर राहील याबाबत सर्वांना सोबत घेऊन पुढील वाटचाल ही होणार असून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसह नाशिक जिल्हा कार्यकारिणी नव्याने घडवण्यासाठी बरखास्त केलेली असली तरी पुढील काळात राज्य कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नव्याने जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे त्याबाबतही त्यांनी उपस्थित त्यांना आश्वासित केले.
राज्य कोर कमिटी सदस्य ज्ञानेश्वर थोरात यांनी काही कटू अनुभव हे सोडून द्यायचे असतात छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेल्या सूचना असतील आदेश असतील त्यांचे काटेकोर पालन करणारा खरा निष्ठावंत शिलेदार हा स्वराज्याच्या आजच्या बैठकीसाठी उपस्थित असून आपल्याला दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपण योग्यरित्याने पार पाडाल अशी त्यांनी देखील अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्या.

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशवा माधवी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गोसावी समाज हा राजांच्या सोबत होता आणि आजही त्यांच्या तेराव्या वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत तितक्याच ताकतीने उभा राहण्याचा शब्द दिलेला असून संपूर्ण गोसावी समाज हा राजांकडे मोठ्या आशेने आणि नेतृत्वाच्या भूमिकेत छत्रपती संभाजी राजे यांच्या सोबत असून भविष्यातील महाराष्ट्रातील सुसंस्कृत चेहरा आणि सर्वांनाच न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असलेले छत्रपती त्यांनी दिलेल्या सर्व आदेशांचं अनुकरण करून स्वराज्याच्या शिलेदारांनी वाटचाल करायची आहे व प्रत्येक सदस्याने तो आजी-माजी पदाधिकारी असेल त्या सर्वांनीच स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये जास्तीत जास्त सदस्य जोडले जातील यासाठी प्रयत्न करायचे आहे.
व पुढील बैठकीमध्ये स्वराज्य वाढीसाठी जे जे गोष्टी करणे गरजेचे आहे त्या करण्याचा मानस आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि वरिष्ठांच्या आदेशाने करण्याचे या ठिकाणी आवर्जून त्यांनी मनोगतामध्ये व्यक्त केल्या.

यावेळी अनेकांनी आपले मनातील चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या तसेच आजच्या बैठकीसाठी प्रामुख्याने चाळीसगाव येथील प्राथमिक स्वरूपामध्ये काही स्वराज्याचे शिलेदार होण्यासाठी अग्रक्रमाने आजच्या बैठकीसाठी उपस्थित होते व त्यांच्यावर होत असलेल्या काही अन्यायांना त्यांनी या बैठकीत वाचा फोडण्याचा प्रयत्न केला व त्यांना या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये स्वराज्य आपल्या पाठीशी राहील अशी काही त्यांना देण्यात आली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी