शासकीय धान्य गोदामातील हमालांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे


   बीड (  प्रतिनिधी      ) बीड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातील हमालांनी विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दिनांक 25 ऑक्टोबर पासून बेमूदत धरणे आंदोलन सुरु केले असून त्याच बरोबर दिनांक 26 ऑक्टोबर पासून फक्त आनंदाच्या शिधा किट उतरवण्याचे काम चालू ठेवण्याचा व उर्वरित काम प्रश्न सुटे पर्यंत न करण्याचा निर्णय घेतला आहे अद्याप पुरवठा विभागाकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामूळे दोन्ही आंदोलन चालू आहेत.
आंदोलनाच्या मागण्या पुढील प्रमाणे द्वार पोहोच योजनेतील दुकानदाराच्या दुकानात माल उतरवण्याचे काम ज्या त्या गोदामातील नोंदीत हमालांकडून करुन घेण्यात यावे शासनाने सुरु केलेल्या थेट वाहतूकीच्या धोरणानूसार त्यातील कामा बाबत स्पष्टता यावी गोदामातील धान्याची आवक जावकचे नियोजन वेगवेगळया वेळेनूसार करण्यात यावे आनंदाच्या शिधा किटची एक वर्षापासूनची थकीत हमाली हमालांना तातडीने मिळावी तसेच मार्च 2012 पासूनचा महागाई निर्देशांकाचा फरक मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार तात्काळ मिळावी दरमहा हमाली मिळण्याचे नियोजन व्हावे या व इतर मागण्यासाठी  सदर आंदोलन चालू आहे.प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी विनंती संघटनेने प्रशासनाला केली आहे.
धरणे आंदोलनात संजय लोखंडे,राम कुकर,रामभाऊ बादाडे,वसंत चव्हाण,वैजनाथ शिंदे,कल्याण शेंडगे,लाला दोनगहु यांचे सह जिल्ह्यातील हमाल सहभागी झाले,तसेच बेमूदत आंदोलनात जिल्ह्यातील सर्व गोदामातील हमालांच्या प्रतिनिधीनी बेमूदत धरणे आंदोलन सुरु केले,धरणे आंदोलनाची व्यवस्था अभिमान आगे,दत्ता शेंडगे व सहकारी यांनी केली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी