सदैव उपेक्षित राहिलेल्या मराठा समाजास कायम टिकणार आरक्षण द्या -नगरसेवक अँड विकास जोगदंड



बीड (प्रतिनिधी) 28 ऑक्टोंबर
 विश्वातील सर्वश्रेष्ठ लोकशाहीचे जनक भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं सामाजिक आणि शैक्षणिक मागास असलेल्या वर्गासाठी आरक्षणाची तरतूद केली असून त्यात कुठल्याही जातीचा उल्लेख केलेला नाही हेच तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टी
सर्वव्यापी समान नेतृत्वाचे प्रतिक आहे.
आपण जर का भारतीय संविधानाचे अधिनियम 338 ख. "मागासवर्गीया करीता राष्ट्रीय आयोग" चे अवलोकन केले तर आरक्षण तरतूद प्रकर्षाने समजेल मग सामाजिक शैक्षणिक मागासलेले कोण तर प्रामुख्याने अनु.जाती. जमाती व इतर मागास प्रवर्ग.
म्हणून संविधानाचे अधिनियम 340,341,342 प्रवर्गानुसार सामाजिक व शैक्षणिक मागासलेल्या वर्गास आरक्षण मिळाले.
मराठा समाज देखील कायम उपेक्षित राहिलेला आहे. बहुजन समाजात मराठा थोरला भाऊ आहे परंतु जसं एकत्र कुटुंबामध्ये थोरल्याला सर्व सांभाळून घ्यावं लागतं सगळी जबाबदारी सांभाळावी लागते थोरलेला नेहमी त्याग समर्पण करावा लागतो अशीच काहीशी परिस्थिती मराठा समाजाची झाल्याने मराठा समाजातील काही मोजके पुढारी सत्तेत गेले म्हणजे सर्व मराठा समाज प्रस्थापित झाला अशी धारणा असणे म्हणजेच सदैव वंचित उपेक्षित राहिलेल्या मराठा समाजावर हा एक प्रकारचा अन्यायच.
मराठा समाज वास्तवात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. शेत-जमीन असली म्हणजे त्यांना आरक्षणाची गरजच नाही असा समज देखील अतिशय चुकीचा आहे. माझ्या वडिलांनी स्वतः शेती केली. काबाड कष्ट करून शेतात काय पिकतं आणि काय टिकतं हा अनुभव घेतल्यास शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना समजतील.
 मराठा समाज सत्ताधारी आहे, शेतजमिनी आहे, प्रस्थापित आहे म्हणून त्यांना आरक्षण नको असा समज माझ्या मते अत्यंत चुकीचा आहे. प्रस्थापित राजकीय भांडवलदाराने त्यांच्या राजकीय सोयीप्रमाणे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली सत्ता काबीज ठेवण्याचे घोतक आजपर्यंत केले आहे. एखाद्या मराठा समाजातील बांधवांनी जातीय द्वेषी भूमिका मांडली म्हणजे ती सबंध मराठा समाजाची भूमिका आहे असं नसून ती भूमिका त्या त्या संस्कारात वाढलेल्या बौद्धिक कुवती नुसार असते तसेच अँड सदावर्ते यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका असून समाजाचा त्याच्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नाही भाजपचा अजेंडा जातीपतीचा असल्याने मराठा आरक्षणासाठी आडकाठी आणली जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण देणे हा सर्वेसर्वा अधिकार महामहिम राष्ट्रपती,केंद्र सरकारचा आहे परंतु यासाठी राज्य सरकारने राज्यपालां मार्फत मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे अशा, अहवालासह केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठवून मराठा समाजाला कायम टिकणारे आरक्षण द्यावे अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी देशाचे महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे ईमेलद्वारे पाठविण्यात आलेल्या, निवेदनातून केली असून मराठा बांधवांना आरक्षण मिळेपर्यंत खांद्याला खांदा लावून लोकशाही मार्गाने या लढ्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे नगरसेवक अँड विकास जोगदंड यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.!

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी