शेवगाव तालुका खंबीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा काल तालुक्यातील विविध ठिकाणी शिर्डी ला जाणाऱ्या बसेस रास्ता रोको करून अडवल्या
{ अविनाश देशमुख }
9960051755
शुक्रवार ता. 28/10/2023
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 26 ऑक्टोबर गुरुवारी दुपारी 02:00 वाजता शिर्डी येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या सुमारे 100 बसेस शेवगाव तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलन करून अडवण्यात आल्या तालुक्यातील मंगरूळ येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली तालुक्यातील सुलतानपूर मठाची वाडी येथे मोकळ्या बसेस ठेवल्या काल सकाळी दहा वाजता भातकुडगाव फाटा येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि त्यांच्या समवेत असलेल्या शेवगाव शहरातील बसेस अडवून श्री मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या आणि भरलेल्या सुमारे 25 ते 30 बसेस परत पाठविण्यात आल्या यामुळे शेवगाव शहरासह तालुक्यातून सुमारे 100 बसेस मोदींच्या सभेसाठी भरून जाणार होत्या परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी पक्षाचा चांगलाच प*** केला मेळाव्या साठी सरकारने सर्व कार्यालयांना अघोषित सुट्टी जाहीर केली होती व सर्व चतुर्थश्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचारी बळजबरीने कार्यक्रमाला नेण्याचा घाट घातला होता परंतु अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंगरूळ मठाचीवाडी आणि भातकुडगाव फाटा येथे आरक्षणाच्या समर्थनार्थ मोदींच्या सभेचा जाहीर निषेध करून जिल्ह्यातील इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये "राजकीय पुढार्यांना" जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत "गाव बंदी" केली आहे आणि सत्ताधारी पक्षाला सणसणीत चपराक दिली आहे शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुढार्यांना गाव बंदी केल्यामुळे अनेकांची पंचायत झाली आहे हा संदेश राज्यात सर्व दूर पसाळल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या पायाखालील वाळू सरकली आहे *मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनास वाढता पाठिंबा हा सत्ताधाऱ्यांच्या डोकेदुखीचा विषय झाला आहे*
शेवगाव तालुक्यातून मिळणारा उदंड प्रतिसाद हा निश्चितच मनोज जरांगे पाटील यांची मनोधैर्य वाढविणार आहे ताजा कलम अहमदनगर जिल्ह्यातून मोदींच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून सुमारे 1000 बसेस चे नियोजन करण्यात आले होते परंतु मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे बऱ्याच बसेस जागेवरच उभ्या राहिल्या त्यामुळे सत्ताधारी भाजपq आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार चांगलेच अडचणीत आले आहे
खास बाब
शिर्डी येथील जाहीर सभेत मराठा आरक्षणाबाबत दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी एक आक्षरी काढले नाही यावरून सरकार मराठा आरक्षणाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे
Comments
Post a Comment