तुलसी महाविद्यालयात बी.सी.ए विभाग प्रमुखपदी प्रा.डॉ.विकास वाघमारे यांची नियुक्ती
बीड(प्रतिनिधी):- तुलसी महाविद्यालय बी.सी.ए विभाग प्रमुखपदी प्रा.डॉ.विकास वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ एल.एम.थोरात यांनी डॉ.वाघमारे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.डॉ.विकास वाघमारे यांनी सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात गांधीनगर येथे एमफील,पीएचडी ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. ते मागील चार वर्षापासून तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथे बीसीए या अभ्यासक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन प्राचार्य प्रो.डॉ एल.एम.थोरात यांनी बी.सी.ए विभाग प्रमुखपदी नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment