घोटी पोलिसाचीं दंबगगिरी फिर्यादीलाच केली अमानुष मारहाण,भा.ज.यु.मो.कडुन तीव्र निषेध पोलीसाच्यां निलंबनाची केली मागणी



   घोटी प्रतिनिधी - (गौरव मांडे यांजकडुन

   ईगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनमधील पोलीसाच्यां दंबगगिरीचा एक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. आपल्या दुचाकीच्या काही साहित्याची घरासमोरुन चोरी झाली आहे अशा आशयाची तक्रार घेऊन घोटी पोलीसात गेलेल्या फिर्यादीसच अमानुष मारहाण केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत सबंधीत दबंग पोलीसावर कारवाई करण्याची मागणी भा.ज.यु.मो.चे रवी गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 
  याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे- घोटी येथील रहिवाशी गौरव शिवाजी मांडे यांच्या रहात्या घरासमोरुन दुचाकीचे काही साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या बाबतची तक्रार घोटी पोलीसात दाखल करणेसाठी मांडे यांनी तब्बल तीनदा चकरा मारल्या. यावेळी पोलीसानीं तक्रार दाखल करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मांडे यांनी याबद्दल वरीष्ठाकडे तक्रार करतो असं म्हटले.या गोष्टीचा राग येऊन उपस्थित दोन पोलीसानीं मांडे यांना लाथाबुक्क्यानीं व पट्टयानीं अमानुष मारहाण केली. यावेळी मांडे यांना सोडवण्यासाठी आलेल्या आई व भावजयी यांनाही धक्काबुक्की करणेत येऊन रात्रीच्या वेळी तब्बल तीन तास बसवुन ठेवले.
   या मारहाणीत मांडे यांना बरीच दुखापत झाली असुन त्यांचा कानाचा पडदा टाकुन बहिरेपणा आला आहे. ही माहिती मांडे यांचेवर उपचार करणार्या डाक्टरानीं दिली आहे. 
  पोलीसाच्यां या क्रुर वागणुकीचा भा.ज.यु.मो.चे रवी गव्हाणे, मराठा सेवा संघाचे नारायण जाधव यांनी तीव्र निषेध केला आहे. 
आमदारानींही केली कान उघाडणी
  घडलेल्या घटनेची माहिती आ.हिरामण खोसकर यांना मिळताच त्यांनीही घोटी पोलीसांशी संपर्क साधत कठोर शब्दात कान उघाडणी केली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी