शहराच्या तुलनेत प्रभाग क्र 4 मध्ये विकास कामांचा वाढता आलेख
विकासप्रिय नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर
रा.कॉ पार्टी बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेशजी क्षीरसागर
यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अँड विकास जोगदंड यांच्या अथक परिश्रमातून मुख्य रस्त्या सह गल्लीबोळातील
रस्त्याचा प्रश्न मार्गी
बीड (प्रतिनिधी) 26 ऑक्टोंबर बीड शहरात सध्या विकास कामाचा धडाका सुरू असून गल्लीबोळासह प्रमुख रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शहरातील जेष्ठ,कनिष्ठ,समवयस नागरिकांतून समाधान व्यक्त करत विद्यमान नगराध्यक्ष डॉ भारतभूषणजी क्षीरसागर, युवा नेते तथा रा.कॉ पार्टी चे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेशजी क्षीरसागर यांचे आभार मानले जात आहेत
डॉ भारतभूषण क्षीरसागर व डॉ योगेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून शहरातील सर्व समस्याचे निराकरण प्रश्न मार्गी लावले जात आहे रस्ते,नाली,स्वच्छता,पाणी,विद्युत सह आदी मूलभूत सुविधावरील समस्या सोडविण्यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ योगेश क्षीरसागर प्रयत्नशील असून मोठ्या पोट तिडकीने कार्यरत आहेत
त्यांच्याच खांद्याला खांदा लावून प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक अँड विकास जोगदंड हे प्रभागातील रस्त्या साठी भरघोस निधी आणून मुख्य रस्त्या सह गल्लीबोळातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत
एकूणच नगरसेवक अँड विकास जोगदंड यांच्या तत्परतेने बीड शहराच्या तुलनेत प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकास कामाचा आलेख उंचावर वाढत आहे
त्यांच्या कार्यपद्धतीचे प्रभागात गोड कौतुक केले जात आहे
आज रोजी प्रभागातील मातोश्री मंगल कार्यालय ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृहा पर्यंतच्या प्रमुख रस्त्याच्या कामाची पाहणी नगरसेवक अँड विकास जोगदंड, जेष्ठ नेते अशोकराव वाघमारे यांनी करत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या दिवाळीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल असे संबंधित कन्ट्रक्शन मार्फत सांगण्यात आले
या प्रसंगी अनिल जोगदंड,मंगेश जोगदंड,सचिन जाधव, राजेशभाई कोकाटे, महादेव वंजारे, साहिल गायकवाड सह आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment