एडीजीपी कृष्णप्रकाश (आयपीएस) यांच्यासह देशपातळीवरील तज्ञांनी केली प्रशंसा
निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य' या पुस्तकाचे भव्य प्रकाशन संपन्न
( प्रतिनिधी आशा रणखांबे ) पुणे
" जागतिक अभिरुचीसंपन्न निसर्गशक्तीच्या एकत्रिकरणाचा आरोग्यदायी महासंकल्प " या सिद्धांताचा पाया रचून देश - विदेशामध्ये निसर्गोपचाराचा अनन्यसाधारण प्रचार - प्रसार करणारे ' मिशन नॅचरोपॅथी ' चे संचालक व सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी लिहिलेल्या " निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य " या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच भारतीय वायुसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे समारंभपूर्वक करण्यात आले . महाराष्ट्र राज्याचे अँडीशनल जनरल ऑफ पोलीस श्री. कृष्णप्रकाश (आयपीएस) यांसह भारतीय सेनेतील महावीरचक्र विजेता नायक दिगेंद्र कुमार , वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले , एअर मार्शल प्रदीप बापट , एअर वाईस मार्शल नितीन वैद्य , सैनिक कल्याण विभागाचे महासंचालक ब्रिगेडीयर राजेश गायकवाड , भारत सरकारच्या जी-20 सचिवालयाचे संचालक श्री. संजीव जैन्य , भारत सरकारच्या युवक कल्याण क्रीडा मंत्रालयाचे संचालक श्री. अतुल निकम , कृष्णलीला वृत्तसमूहाचे प्रमुख डॉ. कौशिक गायकवाड , सुप्रसिद्ध हृदय शल्य विशारद डॉ. यतीन वाघ , संमेलनाध्यक्ष श्री. संतोषभाऊ बारणे , राजमाता जिजाऊ यांचे वडील लखूजीराजे जाधव यांच्या घराण्याचे वंशज महाराज श्री. शिवाजीराजे जाधव , तंजावार घराण्याचे वंशज महाराज श्री. विजयसिंहराजे भोसले या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाचे समारंभपूर्वक भव्य प्रकाशन घडून आले .
साप्ताहिक कृष्णलीला या वृत्तपत्रामध्ये सातत्याने प्रकाशित लेखांचा समुच्चय करून ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' या पुस्तकाची लेखक क्रांती कुमार महाजन यांनी मांडणी व निर्मिती केली आहे . विश्व कीर्तिमान लेखक व निसर्गोपचार तज्ञ क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या जीवनामध्ये निसर्गसाधनेलाच राष्ट्रभाव मानून अनुभव , ज्ञान , संशोधन , अभ्यास आणि सिद्धी यांच्या समन्वयातून हे पुस्तक आरोग्याच्या दृष्टीकोनातून बहुआयामी आणि समृद्ध केले आहे . महाराष्ट्र राज्यामध्ये पोलिसांच्या आरोग्यासाठी निसर्गोपचाराच्या माध्यमातून प्रतिबद्ध राहून कार्य केल्या जाणार असल्याची ग्वाही याप्रसंगी लेखक क्रांती कुमार महाजन यांनी दिली आहे .
लेखक क्रांती कुमार महाजन यांनी विविध विषयांवर अनेक पुस्तके लिहिली असून ' प्राकृतिक चिकित्सा - एक राष्ट्रभाव ' हे त्यांचे पुस्तक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ' संदर्भ - ग्रंथ ' म्हणून निवड - पात्र ठरले आहे . निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसारासाठी क्रांती कुमार महाजन यांनी संपूर्ण भारत देशात आजवर सतरा हजार किलोमीटर अंतराची ' प्राकृतिक चिकित्सा जागरण यात्रा ' पूर्ण केली असून हजारों लोकांना निसर्गोपचाराच्या उपचार व प्रशिक्षणाकरीता त्यांनी प्रवृत्त केले आहे . एकूणच " मिशन नॅचरोपॅथी " च्या माध्यमातून निसर्गोपचाराच्या प्रचार - प्रसाराकरीता प्रतिबद्ध असणारे क्रांती कुमार महाजन हे देशातील तमाम निसर्गोपचारकांना व निसर्गोपचाराच्या संस्थांना एकसंघ करण्याचे अभिनव व अनन्यसाधारण कार्य करीत आहेत . महाराष्ट्र सरकार द्वारा निसर्गोपचाराची अधिकृत कॉन्सिल निर्माण व्हावी व राज्यातील लाखो निसर्गोपचारकांना त्यासंदर्भात न्याय व अधिकृतता लाभावी यासाठी क्रांती कुमार महाजन यांनी आरंभिलेले " मिशन नॅचरोपॅथी " हा आशावाद आता अत्यंत प्रबळ झाला आहे . निसर्गोपचारावर आधारीत विविध पुस्तके व साहित्य त्यांनी निर्माण केले आहे .
अशा प्रकारे निसर्गोपचाराकरीता समर्पित असणारे क्रांती कुमार महाजन यांनी आपल्या सिद्धहस्त अनुभवांतून लिहिलेले ' निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य ' हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल देशपातळीवर त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .
Comments
Post a Comment