संडे स्पेशल दणका मोडला मावा ब्रँडेड गुटखा खाणाऱ्या आणि विकणाऱ्यांचा मानका!!
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
 शेवगाव शहरासह तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात   अण्णा भेसळ निरीक्षक { Food Qualiti Dept. } अहमदनगर विभाग आणि गुन्हे अन्वेषण विभाग { एल. सी. बी. } अहमदनगर  यांच्या धडक कारवाईनंतर ब्रँडेड गोवा गुटखा आर एम डी आणि सुट्टा मावा यांच्या खुल्या विक्रीवर पान स्टॉल वर मिळत नसले तरी गल्लीबोळा चौकांच्या कोपऱ्यात आणि काही ठराविक दुकानांमध्ये दाम दुप्पट भावा जोरदार विक्री सुरू असून हिरा पंधरा रुपये गोवा वीस रुपये आर. एम. डी. पन्नास रुपये सुट्ट्या माव्याची एक पुडी वीस रुपये मोठी पुडी चाळीस रुपये आणि पोत साठ रुपये अशी चढ्या भावाने विक्री सुरू असून काहींनी दुकानाच्या मागच्या दाराने तर काहींनी चौकाचौकात पिशव्या घेऊन माणसं बसविले आहेत काहींनी शहरातील माव्याचे निर्मिती केंद्र खेड्या पाड्यात  हलवले आहे. मावा पाहिजे हिरा गोवा RMD  पाहिजे माझ्या माग  या असं सांगायला पंटर नेमलेले आहेत शेकडो जीवानिशी गेले काही दवाखान्यात ऍडमिट आहेत काही चौका  चौकात पिचकाऱ्या मारून मरण मागत आहेत हे सर्व  थांबणार कधी?
नगर चा एक मोठा व्यापारी  आपली सुपारीचे थकलेले एक कोटी रुपयांचे  पेमेंट वसुली  साठी शेवगांव शहरात हिंडत होता  या वरून या व्यवसायात किती मोठी  गुंतवणूक आणि नफा असेल याचा अंदाज येतो ?
काहींनी ब्रँडेड कंपन्यांचा   साठा शेवगाव मध्ये वातावरण टाइट असल्यामुळे पैठण गेवराई शिरूर कासार आदि शेजारच्या जिल्ह्यांच्या तालुक्यांमध्ये हलवला आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ब्रँडेड गोवा गुटखा सुट्टा मावा आणि सुगंधी सुपारी तंबाखू आणि केमिकलच्या विविध चटण्या यावर बाळगणे विक्री करणे आणि साठा करणे यावर बंदी असून यातच सध्या मोठ्या प्रमानात  पैसा असल्याने अनेक बडे हस्ती आपल्या चेहऱ्याचा पट्यांमार्फत यात मोठी आर्थिक गुंतवणूक करत असतात याला चाप लावणार कोण?
Comments
Post a Comment